Ananya Panday : अनन्या पांडेने शेअर केला जुना फोटो, चाहते म्हणाले…

Ananya Panday : अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावरही अनन्या सक्रिय असते. आताही अनन्या चर्चेत आहे. परंतु, यावेळी कारण वेगळंच आहे. अनन्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती तलावाच्या शेजारी बसलेली दिसत आहे. या फोटोवरून चाहते तिला अनेक प्रश्न विचारत आहेत. काहीजण म्हणत आहेत की, अनन्याला कोणाची आठवणी येत आहे? तर काही जण अनन्या कोठे फिरायला गेली आहे? याबाबत विचारत आहेत. 

प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच अनन्या पांडेलाही प्रवासाची आवड आहे. परंतु, सध्या ती कोठेही फिरायला गेली नाही. परंतु, या पूर्वी अनन्या उदयपूरला फिरायला गेली होती. तोच फोटो तिने परत शेअर केला आहे. पर्वत आणि तलावांनी वेढलेले उदयपूर हे शहर खरोखरच खूपच सुंदर आहे. अनन्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने उदयपूरची खास झलक दाखवली आहे. या पूर्वी फिरायला गेलेला फोटो शेअर करून अनन्याने या सुंदर व्हेकेशनची आठवण करून दिली आहे.


इन्स्टाग्रामवर उदरपूरचे फोटे शेअर करताना तिने त्याखाली कॅप्शनही दिले आहे. “उदयपूरच्या सुंदर आणि  जादुई काळाची आठवत येत आहे” असे कॅप्शन अनन्याने या फोटोला दिले आहे. 

हेही वाचा :  ‘या’ सुंदर व्हिलामध्ये झालंय दीपिकाच्या ‘गहराइयां’चं शूटिंग, एका रात्रीचं भाडं किती आहे माहितीये का?

दरम्यान, सध्या अनन्या ईशान खट्टरला डेट करत असल्याची चर्चा आहे. परंतु, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप मौन बाळगले आहे. अलीकडेच अनन्याने ईशानचा भाऊ शाहिदच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती.   

महत्वाच्या बातम्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …