विश्लेषण : रशियावर आर्थिक निर्बंध लादणारी अमेरिका आणखी युक्रेनियन निर्वासित का स्वीकारत नाही? | Explained Why US does not accept Ukrainian refugees abn 97


अमेरिकेने आतापर्यंत फक्त शंभर युक्रेनियन निर्वासितांना प्रवेश दिला आहे.

युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार, रशियाने फेब्रुवारी २४ रोजी आक्रमण केल्यापासून ३० लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनमधून शेजारच्या देशांमध्ये पलायन केले आहे. मात्र अमेरिकेने आतापर्यंत फक्त शंभर युक्रेनियन निर्वासितांना प्रवेश दिला आहे. काही समीक्षकांनी अमेरिकेच्या या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अमेरिकेने युक्रेनियन निर्वासितांना देशात का घेतले नाही?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या उच्च अधिकार्‍यांनी म्हटले आहे की अमेरिका आवश्यक असल्यास निर्वासितांना स्वीकारण्यास तयार आहे. फिलाडेल्फियातील सहकारी डेमोक्रॅट्सच्या बैठकीत ११ मार्च रोजी बायडेन यांनी, “खरं तर ते येथे आले तर आम्ही युक्रेनियन निर्वासितांचे खुल्या हातांनी स्वागत करणार आहोत,” असे म्हटले आहे.  पण प्रशासनाने वारंवार युक्रेनियन लोकांसाठी युरोपच हे प्राथमिक गंतव्यस्थान असावे असे म्हटले आहे

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस, परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन आणि व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनीही असेच मत व्यक्त केले. साकी यांनी १० मार्च रोजी, “प्रशासनाला विश्वास आहे की बहुसंख्य निर्वासित शेजारच्या देशांमध्ये राहू इच्छितात, जेथे अनेकांचे कुटुंब, मित्र आहेत,” असे म्हटले होते. युक्रेनियन निर्वासितांना युरोपमध्ये संरक्षणाची कमतरता असल्यास ते युनायटेड नेशन्ससोबत निर्वासितांना देशामध्ये आणण्यासाठी काम करेल असे अमेरिकेने म्हटले आहे.

हेही वाचा :  केव्हापासून 'गुंठ्यां'मध्ये मोजली जाऊ लागली जमीन? तुम्हाला माहितीये का हे आहे एका व्यक्तीचं नाव

गेल्या ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर बायडेन प्रशासनाने अफगाणिस्तानातील निर्वासितांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला वेग दिला असला तरी यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. त्या अनुभवातील धडे इतर निर्वासितांच्या पुनर्वसनाला गती देण्यास मदत करू शकतात, असे तीन अमेरिकन अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले.

अधिक निर्वासितांच्या प्रवेशासाठी कोण प्रयत्न करत आहे?

तीन डझनहून अधिक डेमोक्रॅटिक खासदारांच्या गटाने बायडेन यांना ११ मार्चच्या पत्रात निर्वासितांचे प्रवेश वाढवण्यासाठी आणि युक्रेनियन लोकांना मानवतावादी दृष्टीकोनातून तात्पुरत्या यंत्रणेद्वारे अमेरिकेमध्ये जलद प्रवेश करण्यास परवानगी देण्याचे आवाहन केले.

दोन डझनहून अधिक ज्यू-अमेरिकन संघटनांच्या युतीने गेल्या आठवड्यात युक्रेनियन निर्वासितांचे प्रवेश वाढवण्यासाठी बायडेन यांच्यावर दबाव आणला आणि म्हणाले की “अमेरिकेने निर्वासितांसाठी आपले दरवाजे बंद केल्यावर काय होते हे आमच्या समुदायाला खूप चांगले माहित आहे.”

अमेरिका आणखी युक्रेनियन निर्वासितांना स्वीकारू शकेल का?

अमेरिकेने जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये केवळ ५१४ युक्रेनियन निर्वासितांना रशियाने युद्धासाठी तयार केले असताना मार्चसाठी अद्याप कोणताही माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. बायडेन यांनी युरोप आणि मध्य आशियातील लोकांसाठी १२५,००० निर्वासितांपैकी १०,००० जणांना प्रवेश दिला आहे, ज्यात युक्रेनिय नागरिकांचाही समावेश आहे.

हेही वाचा :  RBI Repo Rate : तुमचे कर्ज महाग होणार की स्वस्त? आरबीआयची मोठी घोषणा

मेक्सिकोमधून अमेरिकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या युक्रेनियन लोकांचे काय होते?

या महिन्याच्या सुरुवातीला रॉयटर्सने नोंदवले की हजारो युक्रेनियन आणि रशियन लोक आश्रय घेण्यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर प्रवास करत आहेत, ही प्रवृत्ती मानवतावादी संकट आणखीनच वाढू शकते. गेल्या ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत, नैऋत्य सीमेवर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना सुमारे १,३०० युक्रेनियन लोकांचा सामना करावा लागला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा ‘तो’ मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा ‘लेटर बॉम्ब’मुळे खळबळ

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं …

Maharastra Politics : ‘तानाजी सावंत यांचा तातडीने राजीनामा घ्या, त्यांनी…’, रविंद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलिशान कारनं (Pune Porsche Accident) चिरडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार …