अंबांनीची सून राधिका मर्चंटची स्टायलिश एंट्री, गुलाबी रफल साडी आणि चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माईल

अंबांनीच्या सर्व कार्यक्रमात अबू जानी आणि संदीप खोसला डिझायनर्सचे कपडे वापरण्यात येतात. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या होणाऱ्या सुनेने राधिका मर्चंटने डिझायनर्सच्या फॅशन फिल्म प्रिमियरला हजेरी लावली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुलाबी ब्लश पिंक साडी आणि सुंदरशा चेहऱ्यावर Million Dollar स्माईल पाहूनच चाहत्यांचा कलिजा खलास झालाय.

राधिका मर्चंटने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि तिचे फॅशन स्टेटमेंट अत्यंत स्टायलिश आणि एलिगंट असते. प्रिमियरमध्ये पुन्हा एकदा एखाद्या बार्बी डॉलसारखी दिसणारी राधिका पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. पाहा राधिकाचा लुक (फोटो सौजन्य – योगेन शाह)

​राधिकाची रफल चिक साडी​

​राधिकाची रफल चिक साडी​

राधिकाने ‘मेरा नूर है मशहूर’ या फिल्म प्रिमियरला हजेरी लावली आणि खऱ्या अर्थाने नूर या शब्दाला अर्थ दिला. रफल बॉर्डर्ससह ब्लश पिंक साडी आणि त्यावर गोल्ड आणि सिल्व्हर गोटा पट्टी एम्ब्रॉयडरी असा तिचा पारंपरिक साडीतील लुक होता. या साडीत एखाद्या बाहुलीइतकीच राधिका नाजूक दिसत होती.

हेही वाचा :  Anant Ambani-Radhika Merchant Wedding : 529 कोटींच्या आलिशान घरात घेणार अनंत - राधिका सप्तपदी, जेम्स बाँड व ब्रिटनच्या राणीचं कनेक्शन

राधिकाचा लुक

​आयव्हरी रंगाचा शिमरींग टसल ब्लाऊज​

​आयव्हरी रंगाचा शिमरींग टसल ब्लाऊज​

या साडीसह राधिकाने ब्रॉड स्ट्रेप्स स्लीव्ह्ज असणारा आयव्हरी रंगाचा ब्लाऊज घातला होता. या ब्लाऊजमुळे साडीला वेगळाच लुक प्राप्त झाला होता. त्यावर शिमरींग बेडेड टसल एम्बेलिशमेंट्सचा टच देण्यात आला आहे. गुलाबी रंगाच्या रफल बॉर्डर आणि ब्लाऊजचे हे मॅचिंग अप्रतिम जमून आले आहे.

(वाचा – मौनी रॉयचा साडीतील रॉयल अंदाज, चाहत्यांची नजरच हटेना अदांनी केले घायाळ)

​सिक्वेन वर्क स्वीटहार्ट नेकलेस​

​सिक्वेन वर्क स्वीटहार्ट नेकलेस​

राधिकाने या साडीसह सिक्वेन वर्क असणारा स्वीटहार्ट नेकलेस परिधान केला आहे. ब्लाऊजला मॅचिंग असा ज्वेलरी सेट राधिकाने घातला असून संपूर्ण गळा भरेल असा हा लुक करण्यात आला आहे. हा चोकर नेकलेस आणि त्यावर फ्लोरल स्टेटमेंट इअररिंग्ज राधिकाच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

(वाचा – आलियाच्या प्लंजिंग नेकलाईन ऑलिव्ह ग्रीन ड्रेसची किंमत ऐकाल, तर चाटच पडाल)​

​Hermès ची लक्झुरियस बॅग​

herms-

स्लीक डायमंड ब्रेसलेट हातात घालून तिने साडीच्या रंगाचीच Hermès ची क्लासी केली बॅग कॅरी केली होती. ही बॅग अत्यंत स्टायलिश दिसत असून हाय हिल्स घालत राधिकाने लुक पूर्ण केला.

हेही वाचा :  राज्यात 50 पेक्षा जास्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; लोकसभा निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय

(वाचा – वीणा जगतापचा मराठमोळा साज, सौंदर्य पाहून हरखून जाल)

​ग्लॉसी पिंक लिप शेड मेकअप​

​ग्लॉसी पिंक लिप शेड मेकअप​

या संपूर्ण लुकसाठी मेकअप करताना राधिकाने विंग्ड आयलायनर, लॅशेससह हेव्ही मस्कारा, डार्कन आयब्रो, रफ चिक्स आणि ड्युई मेकअपचा आधार घेतला आहे. त्यासह तिने गालावर हायलायटर लावले आहे आणि ओठांसाठी परपेक्ट ग्लॉसी पिंक लिप शेडचा वापर केला आहे.

राधिकाच्या या लुकने संपूर्ण प्रिमियरमध्ये लक्ष वेधून घेतले होते. या प्रिमियरला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली मात्र खऱ्या अर्थाने नूर आणला तो राधिकाने.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …