Aaditya Thackeray: लग्नासाठी मुलगी कशी हवी? मुंबईची की ठाण्याची? आदित्य ठाकरे खळखळून हसले, म्हणतात…

Aaditya Thackeray Marriage: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंची शिवसेना मोडकळीस आली. एकीकडे उद्धव ठाकरे परिस्थितीवर मात करत असताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी लोकांमध्ये जाऊन ठाकरेंविषयी सहानभुतीचा मतप्रवाह निर्माण केला. तर आदित्य ठाकरे यांना युवा तरूणांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. आदित्य ठाकरे यांची पुर्नबांधणी, स्पष्टोक्तेपणा आणि खळखणीत उत्तर, यामुळे आदित्य ठाकरे अधिच चर्चेत राहिले. अधिवेशनाच्या चर्चा सत्रात विधानसभेत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Marriage) यांच्या लग्नाची हसमुख चर्चा झाली होती. मात्र, सध्या आदित्य ठाकरे यांच्या लग्नाविषयी अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

आदित्य ठाकरे लग्न करणार असतील तर त्याचा खर्च राज्य सरकार करेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadanvis) उत्तर दिलं. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकवला होता. अशातच आता एका मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी स्पष्टच मत मांडलं. मुंबई तकच्या मुलाखतीत शेवटी आदित्य ठाकरेंना लग्नासंबंधित प्रश्न (Aaditya Thackeray Marriage Prediction) विचारण्यात आला, यावर आदित्य ठाकरेंनी थेट उत्तर देणं टाळल्याचं दिसलं.

काय म्हणाले Aaditya Thackeray ?

तुम्ही लग्न कधी करणार आहात? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे खळखळून हसल्याचं दिसतंय. जाऊद्या, म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुठली तरी हवी असेल? मुंबईची हवी की ठाण्याची हवी? राजकारणातील हवी का? असा प्रश्नावर बोलताना बिलकूल नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. त्यावेळी आदित्य ठाकरे यांना अपेक्षा विचारण्यात आल्या. तेव्हा, यावर कुणीतरी जनहित याचिका दाखल केली पाहिजे, असं मला वाटतं, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी उत्तर देणं टाळलं.

हेही वाचा :  मोलकरीण बनून घरात शिरली, गतीमंद मुलाबरोबर काढले लग्नाचे खोटे फोटो; 200 कोटींसाठी रचला खतरनाक प्लान

आणखी वाचा – Political News : राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लक्षवेधीच्या अनुषंगाने लग्नाचा विषय निघाला होता. यावेळी बच्चू कडू यांच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांची लग्नावरून फिरकी घेतली. ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का? की लग्न लावून देतो नाही तर आमच्यासोबत बसा, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी देखील फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं होतं.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …