Breaking News

Aatmnirbhar: आता भारतातही बनणार तेजस MK2 चे इंजिन

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे. याचा एक भाग म्हणून किमान 11 ‘प्रमुख उत्पादन तंत्रज्ञान’ भारतात हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या कालावधीत स्टेट डिनर आणि कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला ते संबोधित करतील.

तंत्रज्ञान हस्तांतरण करार

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान तंत्रज्ञान हस्तांतरणाचा महत्त्वाचा करार केला जाण्याची शक्यता आहे. भारत-यूएस संरक्षण सहकार्याच्या अनुषंगाने नवीन फ्रेमवर्क तयार करण्यात आले. 2015 मध्ये 10 वर्षांसाठी त्याचे नूतनीकरण आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

भारत आणि अमेरिका यांच्यात करार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील स्वदेशी कंपनी तेजस एमके२ साठी अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकच्या GE-F414 INS6 इंजिनसाठी हा करार आहे. लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) Mk1A चे अॅडव्हान्स वर्जन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विकसित आणि उत्पादित करेल. भारतातील सुमारे 80 टक्के मूल्य आणि तंत्रज्ञानासह इंजिन एचएएलकडे हस्तांतरित केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

हेही वाचा :  Coronavirus Update : कोरोनामुळं गोवा सरकारचा मोठा निर्णय; ख्रिसमस, न्यू इयरसाठी जाण्यापूर्वी ही बातमी पाहाच

भारताला मोठे उत्पादन तंत्रज्ञान मिळणार 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, GE-HAL फायटर जेट इंजिन डीलचा भाग म्हणून भारताला किमान 11 प्रमुख उत्पादन तंत्रज्ञान मिळतील. जे भारतात सहज उपलब्ध नाहीत. सूत्रांनी सांगितले की, कराराचा एक भाग म्हणून हा तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यक्रम असू शकतो. कॉम्प्रेशन डिस्क आणि ब्लेड्स, अंतर्गत गरम भागांचे मशीनिंग आणि कोटिंग, सिंगल क्रिस्टल टर्बाइन ब्लेड्सचे कोटिंग आणि मशीनिंग, शाफ्ट बॉटमचे बोरिंग, गंज आणि वितळण्यासाठी विशेष कोटिंग, पॉलिमर मॅट्रिक्स कंपोझिट, पावडर मेटलर्जी मशीनिंग, लेझर ड्रिलिंग आणि ब्लिस्क मशीनिंग ते टेक्नोलॉजी ट्रान्सफर केली जाईल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बापरे! हवेतल्या हवेत विमानाला गचके बसले आणि… हेवी टर्ब्युलन्समुळं प्रवाशांचा थरकाप; कोणी रडलं, कोणी किंचाळू लागलं

Indigo Flight Heavy Air Turbulence left passangers terrified : विमान प्रवासाला निघालं असताना या प्रवासाची …

Maharashtra Weather News : वीकेंडला मान्सूनचा मारा! विदर्भात ऑरेंज अलर्ट; कोकणातही मुसळधार, सर्रास आखा सहलींचे बेत

Maharashtra Weather News : राज्यापासून काहीसा दुरावलेला मान्सून आता परतला असून, या मान्सूननं आता राज्यासह …