“आता लग्न झाल्यानंतर…”, फरहान अख्तरने केला शिबानी दांडेकरसोबतच्या नव्या नात्याबद्दलचा खुलासा | Actor Farhan Akhtar Talk About His Second Marriage And Wife Shibani Dandekar nrp 97


त्यासोबतच त्याने लग्नानंतर शिबानीसोबतच्या नात्याबद्दलचाही खुलासा केला आहे.

अबॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर १९ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. फरहान अख्तरच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा खाजगी विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.विशेष म्हणजे शिबानी दांडेकर प्रेग्नंट असल्यानेच या दोघांनी लग्न केलं अशा अफवा देखील उडाल्या होत्या. मात्र या सर्व गोष्टींवर फरहान अख्तरने स्पष्टीकरण दिले आहे. त्यासोबतच त्याने लग्नानंतर शिबानीसोबतच्या नात्याबद्दलचाही खुलासा केला आहे.

नुकतंच फरहान अख्तरने इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने शिबानी दांडेकरसोबत लग्न करण्यासह त्यांच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल सांगितले. यावेळी तो म्हणाला, ‘आम्ही एका वेगळ्या आनंदी जगात आहोत आणि खूप आनंदी आयुष्य जगत आहोत.’

या मुलाखतीत फरहानला लग्नानंतर शिबानीसोबतच्या नात्यात काही फरक जाणवतो का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तो म्हणाला, “मला काही वेगळं वाटतंय की नाही, याची मला माहिती नाही. पण शिबानी आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र आहोत. आता लग्न झाल्यानंतर आम्ही आमच्या नात्यावर एक अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. पण आमचे नाते हे फारच वेगळे आहे. आम्ही डेट करायला सुरुवात केल्यापासून आम्हाला याची जाणीव होत गेली. त्यानंतर आता आम्ही त्या नात्याला एक वेगळ्या पातळीवर नेले. त्यामुळे हे फार छान वाटतं.

हेही वाचा :  यांचही ठरलं! आता मनिषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश

दरम्यान नुकतंच शिबानीनेही एक पोस्ट शेअर करत फरहानशी लग्न का केलं याचा खुलासा केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करताना शिबानीनं फरहानशी लग्न करण्याचं कारण सांगितलं. तिने लिहिलं, ‘तुमची वहिनी होण्यासाठी मी फरहानशी लग्न केलं.’ शिबानीची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत होती.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर एकमेकांना २०१६ पासून डेट करत होते. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर फरहाननं शिबानीसोबतनं नातं सर्वांसमोर मान्य केलं होतं. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असत आणि अखेर या वर्षी त्यांनी लग्न करून आपल्या या नात्याला नवं नाव दिलं. खंडाळा येथील जावेद अख्तर यांच्या फार्महाऊसवर हा विवाहसोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.

‘झुंड’ चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, सहा दिवसात कमावले इतके कोटी

फरहान अख्तरचे हे दुसरं लग्न आहे. त्याने यापूर्वी सेलिब्रेटी हेअरस्टायलिस्ट अधुना भाबानी हिच्याशी लग्न केले होते. २००० मध्ये ते विवाहबंधनात अडकले. फरहान अख्तरनं २०१६ साली पत्नी अधुनापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता आणि २०१७ साली दोघांचा कायदेशीर घटस्फोटही झाला. जवळपास १६ वर्षांचा संसार मोडत हे दोघं वेगळे झाले.

हेही वाचा :  Farhan-Shibani Wedding : फरहान अख्तरच्या लग्नात ह्रतिकची उपस्थिती, दोघांचा डान्स व्हायरल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …