“…तेव्हाच बीड जिल्हा खऱ्या अर्थाने बदनाम झाला,” पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ पत्रानंतर धनंजय मुंडेंची टीका


बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेच्या मुद्द्यावरुन सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली.

बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. समजा मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेला वाट्टेल तसं बदनाम करा. मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, बीड जिल्हा बिहार सारखा झाला आहे, बीड जिल्हा मागास आहे, असे म्हणून माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका, असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला. पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि माफियाराज यासंदर्भात थेट गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर आता मुंडे यांनी वरील वक्तव्य केले.

“सर्वात आधी भारतीय जनता पार्टीने बीड जिल्ह्याची बदनामी केली. माजी पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीने पत्र लिहिले तेव्हाच खऱ्या अर्थाने बीड जिल्हा बदनाम झाला. बीड जिल्हा असा बीड जिल्हा तसा असे चालू आहे. तुम्ही बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. समजा मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेंला वाट्टेल तसं बदनाम करा. मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका,” असे धनंजय मुंडे म्हणाले.

हेही वाचा :  महिलेला निर्वस्त्र करुन मासिक पाळीचं रक्त गोळा केलं, 'त्या' कारणासाठी मांत्रिकाला विकलं... महाराष्ट्र हादरला

दुसरीकडे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार चंद्रकांत पाटील, नमिता मुंदडा, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आदी नेत्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात ८ मार्च रोजी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न थेट सभागृहात मांडण्यात आला. बीड जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची घोषणा केली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांच्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाण साधल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

5 नव्हे तर आता दीड तासांत पोहोचणार अलिबागमध्ये, पावसाळ्यानंतर सुरू होतंय प्रकल्पाचे काम

Virar Alibaug Mulitmodal Corridor: मान्सूननंतर विरार-अलिबाग कॉरिडोरचे बांधराम सुरू होण्याची शक्यता आहे. 126 किमी लांबीच्या …

‘पुण्यातील ससून रुग्णालय ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा’ आहे का? आधी ललित पाटील, आता डॉक्टरांनी..’

Sasun Hospital Doctor Arrested: पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा’ आहे? असा …