Bhagwant Mann : मुहूर्त ठरला ! ‘या’ दिवशी भगवंत मान घेणार पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, त्याआधी अमृतसरमध्ये…


येत्या १६ मार्च रोजी भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी म्हणजेच आप या पक्षाला बहुमत मिळालं असून त्यांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीचे निकाल हाती आल्यापासूनच पक्षाने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आपचे विजयी उमेदवार भगवंत मान हे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असून त्यांच्या शपथविधीची तयारी आता सुरु झाली आहे. येत्या १६ मार्च रोजी भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

शपथविधीच्या कार्यक्रमाला भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण दिलं आहे. येत्या १६ मार्च रोजी शपथविधीचा हा सोहळा पार पडेल. याआधी आप पक्षाला भरभरून मतं दिल्यामुळे पंजाबच्या जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी तसेच विजयोत्सव साजरा करण्यासाठी भगवंत मान १३ मार्च रोजी अमृतसर येथे रोड शो करणार आहेत. या रोड शोमध्ये मान यांच्यासोबतच अरविंद केजरीवाल यांचीही उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान,याआधी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला अंतर्गत कलहाचा फटका बसला. नवज्योतसिंग सिद्धू, चरणजितसिंग चन्नी यांच्यासारख्या बलशाली नेत्यांना परावभावाला सामोरे जावे लागले. तर आप पक्षाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असून त्यांनी बहुमताचा आकडा पार केलाय. आपने एकूण ११७ जागांपैकी तब्बल ९२ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या तब्बल ६९ जागा कमी झाल्या असून यावेळी काँग्रेसला फक्त १८ जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा :  Maharashtra Rain Updates : आज विजांच्या कडकडाटासह वादळ, 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …