‘झुंड’ पाहिल्यावर आमिरला अश्रू अनावर; अमिताभ बच्चन म्हणातात “तो नेहमीच अति…”


दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटावर काही दिवसांपूर्वी आमिर खाननं भावुक प्रतिक्रिया दिली होती.

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘झुंड’ सध्या बराच चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे. जेव्हा बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं पहिल्यांदा चित्रपट पाहिला त्यावेळी त्यानं फार भावुक प्रतिक्रिया दिली होती. एवढंच नाही तर त्यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. यावर आता अभिनेता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘झुंड’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. जेव्हा हा चित्रपट आमिर खाननं पाहिला त्यावेळी तो अक्षरशः रडला होता. त्यानं या चित्रपटाचं खूप कौतुकही केलं होतं. हा अमिताभ यांचा आतापर्यंतचा सर्वात उत्तम चित्रपट आहे असंही आमिरनं प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं. आमिरच्या या प्रतिक्रियेवर आता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि आमिरचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा- प्रसिद्ध अभिनेत्यानं १५ वर्षीय रेखा यांना तब्बल ५ मिनिटं जबरदस्तीने केलं किस, अन्…

चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनापूर्वीच आमिरला हा चित्रपट दाखवला होता आणि त्यानंतर आमिरच्या प्रोडक्शन हाऊसनं यावर एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. यामध्ये आमिर म्हणतोय, ‘काय चित्रपट आहे. सर्वोत्तम. हा पहिला चित्रपट आहे ज्याला खासगी स्क्रिनिंगच्या वेळी स्टँडिंग ओव्हेशन मिळालं आहे. अमिताभ बच्चन याचा अभिनय तर उत्तमच आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपट केले मात्र हा सर्वाोत्तम चित्रपट आहे.’

हेही वाचा :  पवन कल्याणने उडवली जॉन अब्राहमची झोप, ‘पुष्पा’नंतर ‘हा’ चित्रपट होणार हिंदीत प्रदर्शित

आणखी वाचा- बिपाशा बासूच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा, पती करण सिंग ग्रोवर सोशल मीडियावर होतोय ट्रोल

आमिरच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना अमिताभ बच्चन म्हणाले, ‘आमिर नेहमीच अति-उत्साहित होतो. पण मी त्याचे आभार मानतो. कारण मला वाटतं की, तो एक उत्तम समीक्षक आहे. त्यांच्या या चांगल्या शब्दांसाठी मी त्याचे आभार मानतो.’ दरम्यान ‘झुंड’ चित्रपट पाहिल्यानंतर मराठीतील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय काही राजकीय व्यक्तींच्याही प्रतिक्रिया चर्चेत आहेत. या चित्रपटाचं सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर…’, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar On Ambulance Scam : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा …

औरंगजेबाने तोडलेली मंदिर पुन्हा बांधण्यापासून महिलांची सेना बनवण्यापर्यंत..’, महाराणी अहिल्याबाईंची प्रेरणादायी कहाणी

Ahilyabai Holkar jayanti 2024: 31 मे रोजी  महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जाते. …