..तर खनिज तेल ३०० डॉलरची मात्रा गाठेल


नवी दिल्ली : रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे अमेरिकेसह युरोपीय देशांकडून रशियाच्या पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. मात्र पाश्चात्त्य देशांनी रशियावरील तेल आयातीवर निर्बंध लादल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे घातक परिणाम होतील. खनिज तेलाच्या किमती िपपामागे ३०० डॉलरचा स्तरही गाठतील, असा इशारा रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी मंगळवारी दिला.

अमेरिकेसह युरोपीय देशांनी रशियावर विविध मार्गानी आर्थिक निर्बंध लादले आहेत. आता रशियाकडून होणाऱ्या तेल निर्यातीवर निर्बंध लादल्यास जागतिक पातळीवर तेलाच्या पुरवठय़ात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. एकटय़ा रशियाचा जागतिक खनिज तेल पुरवठय़ात १० टक्के वाटा असल्याने निर्बंध आणल्यास जागतिक पातळीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. जुलै २००८ नंतर प्रथमच खनिज तेलाच्या किमती १३० डॉलर प्रतिपिंपावर पोहोचल्या आहेत.

उत्पादन शुल्कात कपातीशिवाय पर्याय नाही 

नवी दिल्ली: जागतिक पातळीवर कडाडत्या खनिज तेलाच्या किमतींची झळ सर्वसामान्यांना बसू नये यासाठी केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० ते १२ रुपयांची कपात करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे मत माजी केंद्रीय सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी मंगळवारी नोंदविले.

हेही वाचा :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन

केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात करण्यास वावही दिसून येतो. विशेषत: अप्रत्यक्ष करापोटी वधारते मासिक संकलन पाहता, याचा सरकारी तिजोरीवर मोठा परिणाम संभवत नाही. मात्र तसे न केल्यास तेल वितरण कंपन्यांना मोठय़ा तोटय़ाला सामोरे जावे लागू शकते, असे गर्ग यांनी सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून इंधनदराच्या भडक्यामुळे त्रासलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात करण्यात आली होती.

The post ..तर खनिज तेल ३०० डॉलरची मात्रा गाठेल appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …