Breaking News

वयाच्या ३८ व्या वर्षी प्रेंग्नेंट असताना मंदिरा बेदीची झाली होती ‘अशी’ अवस्था


प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर एकच प्रश्न विचारण्यात येतो तो म्हणजे, आम्हाला गूड न्युज कधी मिळणार. असेच काही तरी बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मंदिरा बेदी सोबत घडली होती. मंदिराने वयाच्या ३८ व्या वर्षी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मंदिराने प्रेग्नेंसी आणि नैराश्यवर वक्तव्य केले आहे.

मंदिरा वयाच्या ३८ व्या वर्षी प्रेग्नेंट होती. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत मंदिराने उशीरा प्रेग्नेंसीचा का विचार केला आणि प्रेग्नेंसीच्या सातव्या महिन्यात तिने कसे काम केले. पुढे तिला तिचे काम आवडते आणि ती प्रेग्नेंट असतानाही तिने याला कामाच्या मध्ये येऊ दिले नाही.

आणखी वाचा : “पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव

मंदिरा म्हणाली, “तुम्ही वयाने जितके मोठे व्हाल तितकं प्रेग्नेंट होणं कठीण होतं. माझ्या बाबतीत असं घडलं आहे. माझ्यासाठी ते खूप कठीण होतं. माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना मुलं होती आणि त्यात काका-काकू, आई-वडील विचारायचे गूड न्यूज आहे का? तुम्ही आम्हाला गूड न्यूज कधी देत ​​आहात? तुझं लग्न होऊन बरीच वर्षे झाली. तर आम्हाला गूड न्यूज का मिळत नाही, असे अनेक प्रश्न सतत विचारण्यात येत होते. वयाच्या ३८ व्या वर्षी मी दोन महिन्यात प्रेग्नेंट झाली होती आणि वयाच्या ३९ व्या वर्षी मी वीरला जन्म दिला.

आणखी वाचा : “जात…जात नाही तोवर…”, केदार शिंदे यांनी ‘झुंड’ चित्रपटावरुन केलेले ट्वीट चर्चेत

मंदिराने २००३ आणि २००७ मध्ये ICC क्रिकेट विश्वचषकाचे सुत्रसंचालन केले होते. यावेळी ती सात महिन्यांची प्रेग्नेंट होती. त्याने २००४ आणि २००६ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच सोनी मॅक्ससाठी इंडियन प्रीमियर लीग सीझन २ चे आयोजन केले होते.

आणखी वाचा : “मुलींसारखं का वागतोयस आणि पर्स…”, अक्षय कुमारचा मुलगा आरव झाला ट्रोलिंगचा शिकार

मंदिरा आणि राज कौशल यांची भेट १९९६ साली झाली होती. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी १४ फेब्रुवारी १९९९ रोजी लग्न केले. लग्नाच्या १२ वर्षांनंतर मंदिराने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिच्या मुलाचे नाव वीर कौशल आहे. त्याच्या जन्मानंतर नऊ वर्षांनी २०२० मध्ये मंदिरा आणि राजने तारा नावाच्या मुलीला दत्तक घेतलं. तर राज कौशल याचे ३० जून २०२१ रोजी निधन झाले.

The post वयाच्या ३८ व्या वर्षी प्रेंग्नेंट असताना मंदिरा बेदीची झाली होती ‘अशी’ अवस्था appeared first on Loksatta.



Source link

हेही वाचा :  मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; 'या' आमदारांचे मंत्रीपदाचं स्वप्न होणार साकार

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘…तर हेतू साध्य होणार नाही,’ सुप्रीम कोर्टाचा अल्पवयीन मुलाला जामीन देण्यास नकार; पुणे अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय चर्चेत

पुण्यात बेदरकारपणे कार चालवत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या अल्पवयीन चालकाला कोर्टाने जामीन दिल्यानंतर नाराजी व्यक्त …

प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे दरम्यान 28 मे ते 2 जूनपर्यंत अनेक ट्रेन रद्द होणार, वाचा संपूर्ण लिस्ट

Mumbai-Pune Train cancelled List: मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 28 …