IPL 2022 चं बिगुल वाजलं ; CSK विरुद्ध KKR यांच्यातील सामन्याने होणार १५ व्या हंगामाची सुरुवात


२६ मार्च ते २९ मे दरम्यान मुंबई आणि पुण्यात ७० लीग सामने खेळवले जाणार

बीसीसीआयने रविवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या १५ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकानुसार, आयपीएल २०२२ चे सर्व लीग सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जातील. ६५ दिवसांच्या कालावधीत एकूण ७० लीग सामने आणि ४ प्लेऑफ सामने खेळवले जातील.

वानखेडे स्टेडियमवर २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील ब्लॉकबस्टर लढतीने IPL च्या १५ व्या हंगामाची सुरुवात होईल.

लीगचा पहिला डबल-हेडर २७ मार्च रोजी होणार आहे. ज्याची सुरुवात ब्रेबॉर्नमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्याशी होईल आणि दिवसाचा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. पुण्यातील एमसीए स्टेडियमवरील पहिला सामाना २९ मार्च सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.

IPL 2022 : विषय संपला..! मेगा ऑक्शननंतर ‘असे’ आहेत १० संघ आणि त्यांचे खेळाडू; नक्की वाचा!

हेही वाचा :  IPL 2022 Mega Auction : कधी, कुठे, केव्हा होणार महालिलाव? वाचा एका क्लिकवर!

वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर एकूण २०-२० सामने तर ब्रेबॉर्न, MCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे येथे १५-१५ सामने होतील. तर, वानखेडे स्टेडियमवर सनराईजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात २२ मे रोजी लीग टप्प्यातील शेवटचा सामना खेळवला जाईल. प्लेऑफ आणि २९ मे रोजी होणार्‍या अंतिम सामन्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …