भाजपही राज्यात भाकरी फिरवण्याच्या तयारीत

BJP New Maharashtra Executive : भाजपच्या गोटातून मोठी बातमी. कारण लोकसभेसाठी भाजपने आता कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजप नवी टीम उभी करण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीत कुणाला स्थान मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार याचीही उत्सुकता आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यभरात नव्या नियुक्त्या करणार असल्याचे कळत आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीत तेव्हा मोठे फेरबदल दिसणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्षपदापासून विविध पदांवर नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. प्रदेश कार्यकारिणीची नवी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. 

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र भाजपात मोठे फेरबदल होत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आज प्रदेश कार्यकारिणी जाहीर करत आहेत. तब्बल 1200 जणांची नवी टीम असणार आहे. राज्यातलं केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेते, विशेष निमंत्रित अशा सर्वांच्या नावांची आज घोषणा होत आहे. दर तीन वर्षांची भाजपची प्रदेश कार्यकारिणी बदलते. मात्र मावळती कार्यकारिणी साडेतीन वर्षांपासून कार्यरत आहे.

नव्या कार्यकारिणीत जवळपास 80 टक्के चेहरे नवे असतील. 6 सरचिटणीस, 16 उपाध्यक्ष, 16 सचिव यांच्यासह 105 जणांची नवी कार्यकारिणी असेल. एरवी काही आमदारांना सरचिटणीस किंवा उपाध्यक्षपद दिलं जाते. मात्र यावेळी त्यांना ही संधी दिली जाणार नाही अशी माहिती आहे. त्याऐवजी सर्व आमदारांना विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात येईल. 

हेही वाचा :  कोकण प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार विशेष मेमू ट्रेन

दरम्यान, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास  1200 लोकांची टीम असणार आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी अपेक्षित होती. या कार्यकारिणीच्या माध्यमातून 2024 च्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. 48 लोकसभा आणि 200  हून अधिक विधानसभा युती म्हणून जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. जुनी आणि नवीन कार्यकारिणी मिळून आम्ही एकत्रित हा प्रयत्न करु, त्यामध्ये चांगले यश आम्हाला प्राप्त होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

सध्या भाजपच्या कार्यकारणीत जुने आणि नवे सर्व कार्यकर्ते मिळून काम करत आहेत. जनसंघापासून ते भाजपच्या निर्माणापर्यंत 60 ते 65 वर्षे वयाचे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाचाही आदर करुन त्यांनाही आम्ही सामावून घेणार आहेत. त्यामुळे या कार्यकारणी सगळ्यांनाच स्थान मिळेल, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नक्की कोणाला स्थान मिळणार याचीही उत्सुकता भाजपमध्ये आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …