मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना

Shivsena Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात सापडले आहेत.  विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेना शिंदे गटात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदेंची डोकेदुखी वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना अशी अवस्था झाली आहे. 

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणाराय.. विधानसभेच्या आमदारांच्या संख्याबळानुसार  11 पैकी शिंदेंच्या शिवसेनेचे 2 आमदार विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात.. मात्र या जागांवरून मुख्यमंत्री शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यताय.. दोन जागांसाठी इच्छुकांची भाऊ-गर्दी झाली आहे. शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी अनेकजण इच्छुक आहेत.  

शिंदे गटाकडून वि.परिषदेसाठी इच्छुक असलेले उमेदवार

दोन जागांसाठी इच्छुकांची भाऊ-गर्दी झालीय… संजय मोरे, मनिषा कायंदे, भावना गवळी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने हे विधान परिषदेसाठी इच्छूक आहेत… लोकसभेत उमेदवारी नाकारलेल्यांची विधानपरिषदेत पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.

भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांची लोकसभेला उमेदवारी कापण्यात आली होती. अशा नेत्यांचं पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे आता एकनाथ शिंदे कुणाला संधी देणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे.
विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या यादीत महादेव जानकरांचं नाव असणार का? 

हेही वाचा :  तरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?

विधानपरिषदेच्या 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपले उमेदवार देणार.  त्यात भाजपकडून एका अपक्ष उमेदवाराला उमेदवारी देण्यात येईल अशी माहिती मिळतेय. महायुतीत घटत पक्ष म्हणून सन्मान दिला पाहिजे अशी भूमिका महादेव जानकर यांनी आधीच मांडलीय. विधान परिषद किंव्हा राज्यसभेत स्थान दिले पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं होतं.मात्र विधान परिषदेसाठी अजून महादेव जानकर यांच्याशी महायुतीनं संपर्क साधलेला नाही अशी माहिती मिळतेय. आज-उद्यामध्ये जाहीर होणा-या विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या यादीत महादेव जानकरांचं नाव असणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ISS वर अनर्थ टळला: रशियन सॅटेलाईटचा स्फोट होताच चीनने अवघ्या 6 तासांत बनवला कवच!

China Tiangong Space Station:  मागील आठवड्यात अंतराळात रशियन सॅटेलाईटचा स्फोट झाला यामुळे एकच खळबळ उडाली. …

बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, ‘कोणतीही…’

Ajit Pawar Vs Yugendra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी …