भुशी डॅमजवळ जिथं अख्ख कुटुंब गेलं तो स्पॉट पाहिल्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही; खरचं इथं अस काही तरी घडलं होत का?

Bhushi Dam : भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये 10 जण अडकले.  अख्ख कुटुंब डोळ्यादेखत वाहून गेलं… पर्यटनासाठी पुण्यातून लोणावळ्याला आलेलं कुटुंब भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडालं. यात लहान मुलांचाही समावेश आहे…

अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात दहाजण अडकले

साहिस्ता लियाकत अन्सारी वय- 36, अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय- 13, उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय- 8 वर्षे अशी मृत्यू झालेल्या तिघांची नाव आहेत. तर अदनान अन्सारी वय- 4 वर्षे, मारिया अन्सारी वय- 9 वर्षे या दोघांचा शोध सुरू आहे. तीन जणांचा मृतदेह मिळाला असून दोन जणांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. तेव्हा धबधब्यात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात दहाजण अडकले, पैकी 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलं तर पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्या कुटुंबातील लहान मुलीला पाण्याबाहेर काढलं, पर्यटक डॉक्टरने सीपीआर देऊन जीवनदान दिलं. 

आज त्याच स्पॉटवर पाण्याचा प्रवाह अगदी साधारण

आज त्याच स्पॉटवर पाण्याचा प्रवाह अगदी साधारण दिसून येतो. मात्र रविवारी दुपारी तीनच्या सुमारास हे चित्र वेगळं होतं. अन्सारी कुटुंब धबधब्यात पाणी कमी असताना खडकावर उभे राहिले. मात्र, पाण्याचा प्रवाह अचानक एवढा वाढला की ते संपूर्ण कुटुंब तिथेच अडकून पडलं. काही क्षणात पाणी मोठ्या प्रमाणात वाढलं… 

हेही वाचा :  पुणे - ....अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

काही तरुणांनी झाडाची फांदी तोडून ती फेकण्याचा प्रयत्न केला. पकडून ठेवा असं सफेद शर्टातला एक मुलगा ओरडून त्या कुटुंबाला सांगतो. धबधब्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने सगळेजण एकमेकांना पकडून आपला जीव वाचण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पाण्याच्या प्रवाहासमोर हे सगळे टीकू शकले नाहीत. त्यामुळे सगळेजण वाहून गेले…यात पाच जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, 5 जण वाहून गेले.

बंदी असताना हे कुटुंब धबधब्याकडे गेलं

धक्कादायक बाब म्हणजे बंदी असताना हे कुटुंब धबधब्याकडे गेले. लोणावळ्यात किंवा इतरही पर्यटन स्थळांवर सावधानता बाळगा असा इशारा दिलेला असतो. मात्र, तरीही पर्यटक याकडे कानाडोळा करत असल्याचं वारंवार दिसून आलंय. जर अन्सारी कुटुंबियांनीही याचं पालन केलं असतं तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता.

भुशी डॅम दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलीय.. त्यानुसार आता पर्यटनस्थळांसाठी मुख्यमंत्र्यांनी निर्देश जारी केले आहेत.  धोकादायक पर्यटन स्थळांचा सर्व जिल्हाधिका-यांना आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावण्याचे तसेच  पर्यटन स्थळांवर जीवन रक्षक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  रुग्णवाहिका ठेवा तसंच एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी ठेवा असे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

हेही वाचा :  Pune News : उत्साहीपणा नडला! Reel च्या नादात तरुण गेला वाहून; ताम्हिणी घाटातील अंगावर शहारे आणणारा VIDEO

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मला हात लावू नका’, प्रिन्सिपलला शिक्षकांनीच धक्के देत ऑफिसबाहेर काढलं, मोबाईलही खेचून घेतला अन् अखेर…; पाहा VIDEO

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये चक्क महिला मुख्याध्यापकाला धक्क देत कार्यालयाबाहेर काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली …

वसईहून ठाण्याला जाण्यासाठी आता भुयारी मार्ग; काय आहे हा प्रकल्प?

Tunnel Between Vasai To Thane: वसईवरुन ठाण्याला लोकलने जायचं म्हणजे खूप वेळ खर्ची होतो. तर, …