पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातली

Pune Crime News: विद्येचे माहेरघर असलेले पुणे सध्या वेगळ्याच कारणांमुळं चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोर्शे अपघात प्रकरण देशभरात चर्चेत आहे. या अपघातात दोन तरुणांनी जीव गमावला होता. तर, पोर्शे कार चालवणारा आरोपी अल्पवयीन असल्याने तसंच, मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आल्यानंतर समाजातून एकच संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलीस चौकशी सुरू असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाच्या अंगावर चार चाकी कार घालून त्याला गंभीर जखमी केले आहे. या घटनेत निलेश शिंदे नावाचा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Love Affair News In Marathi)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रिणीसोबत बोलणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी घालून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. या घटनेत निलेश शिंदे गंभीर जखमी झाला आहे. तर, तरुणाच्या अंगावर गाडी घालणाऱ्या सुशील काळे या तरुणाविरोधात 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, जेव्हा अपघात घडला तेव्हा आरोपी काळे याने मद्यपान केले असल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड परिसरात काल मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. यशवंत नगर येथील शंकर चौधरी चौक परिसरातील ही घटना आहे. 

हेही वाचा :  इराणहून पुण्यात शिकायला आला, तिघांसोबत भविष्य बघायला गेला अन् तिथेच...

दरम्यान, जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश शिंदे आणि सुशील काळे यांचे एकाच तरुणीवर प्रेम होते. निलेशसोबत वाद झाल्यानंतर तिचे सुशीलसोबत प्रेमसंबंध होते. मध्यरात्री निलेश त्याच्या एक्स प्रेयसीला भेटायला आला होता. तरुणीने याची माहिती सुशील काळे याला दिली होती. निलेश तिच्याशी बोलत उभा असताना चार चाकी कारने सुशीलने कार त्यांच्या अंगावर घातली. यात निलेश गंभीर जखमी झाला आहे. 

दरम्यान, निलेशच्या अंगावर कार घालून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सुशील काळे याला अटक केली आहे. तसंच, या प्रकरणी त्यांच्यावर गन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यात ट्रकने महाविद्यालयीन तरुणांना चिरडले

पुण्यातील खराडी बाय पास जवळ एका ट्रकने महाविद्यालयीन तरुणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री हा अपघात झाला आहे. मृत्यू झालेले युवक मूळचे लातूरचे असून ते सध्या वाघोली येथे शिक्षण घेत होते. मालवाहतूक ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने येत होता यावेळी खराडीतील जकात नाका चौकात हा अपघात घडला. श्यामबाबू रामफळ गौतम असे चालकाचे नाव असून
त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून ट्रक चालक याला ताब्यात घेऊन त्याची ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे

हेही वाचा :  थंडीत दुप्पट वेगाने वाढतं खराब कोलेस्ट्रॉल, चुकूनही खाऊ नका हे 6 पदार्थ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Hathras Stempade: याला म्हणतात अक्कलशून्य! 121 जण ठार झाल्यावरही भक्त म्हणतो, ‘ते विश्वाचे निर्माते, त्यांचा…’

Hathras Stampede: हाथरसमधील चेंगराचेंगरीत 121 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण इतकं होऊनही काही …

Hathras Stampede: निर्भयाचे आरोपी आणि सीमा हैदरसाठी लढणाऱ्या वकिलाची भोले बाबाकडून नियुक्ती; कोण आहेत एपी सिंह?

Hathras Stampede: हाथरसमधील दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभऱात खळबळ उडाली आहे. शिकंदराराऊ येथे सूरज पाल उर्फ नारायण …