Pillars Of Light: रात्रीस खेळ चाले…! आभाळात अचानक दिसले रहस्यमयी प्रकाशमान थांब; पाहून उडाला थरकाप…

Pillars Of Light: आकाश, अवकाश आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींबाबत कायमच प्रत्येकाच्या मनात कुतूहल आणि कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली आहे. संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की, या अनोख्या आणि कैक मैल दूर असणाऱ्या विश्वासंदर्भातील असंख्य प्रश्नांची उकलही हळुहळू होताना दिसत आहे. त्यातच जगभरात चर्चा सुरुये ती म्हणजे आकाशातील अशा प्रकाशमान गोष्टीची जी पाहून सारेच भारावले आहेत. ही गोष्ट म्हणजे चमकणारे खांब… 

कुठे दिसलं हे दृश्य? 

नुकतंच जपानमध्ये किनारपट्टीला लागून असणाऱ्या एका शहरातून आभाळात पाहिलं असता रहस्यमयीरित्या चमकणारे 9 खांब दिसले. आभाळात दिसणारं हे दृश्य पाहून स्थानिक हैराण झाले, नेमकं घडतंय काय हेच त्यांना कळत नव्हतं. सध्या सोशल मीडियावर जपानमधील हेच फोटो व्हायरल होत असून, माशी नावाच्या एका स्थानिक व्यक्तीनं घडल्या प्रकारासंदर्भात माहिती दिली. 

घरातून बाहेर पडताच आभाळाकडे पाहिलं असता अचानक आकाशात प्रकाशमान गोष्टी दिसल्या, साधारण खांबाच्या आकाराप्रमाणं दिसणारा हा प्रकाश ठराविक अंतरानं दिसत होता. माशीनं कसंबसं हे दृश्य कॅमेरात कैद करत ते सोशल मीडियावर शेअरही केलं. आता मुख्य प्रश्न होता तो म्हणजे हे नेमकं होतं काय? हा एलियन्सचा इशारा होता? हे परग्रहावरून येणारे संकेत होते की आणखी काही, अशा एक ना अनेक प्रश्नांनी माशीच्याची मनात घर केलं होतं. 

हेही वाचा :  Maharashtra Politics: अशोक चव्हाण, नाना पटोले काँग्रेसचे सर्व नेते भाजपसोबत... शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा

पडद्यामागची गोष्ट 

11 मे रोजी जपानच्या टोटोरी प्रांतावरील आभाळात हे प्रकाशमान खांब पाहायला मिळाले. स्थानिकांसाठी हा प्रकार अनपेक्षित होता. पण, एलियन आणि एलियनभोवती फिरणाऱ्या शंका मात्र या वातावरणात सातत्यानं टिकून होत्या. प्रत्यक्षात मात्र हा प्रकार अपेक्षेपलिकडचाच होता. 

हा उजेड किंवा हे प्रकाशमान खांब कोणा एलियनचा इशारा किंवा कोणता परग्रहावरील उजेड नसून, हा उजेड होता जहाजांचा. जपानच्या या शहरातून समोरच्या बाजूस असणाऱ्या एका भागातून मासेमारी करणाऱ्या जहाजांचं प्रतिबिंब ढगांमध्ये परावर्तित होऊन हा उजेड निर्माण झाला होता. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते या उजेडाला ‘इसरिबी कोचू’ म्हणून संबोधतात. अशा घटना वारंवार घडत नसल्यामुळं अनपेक्षितरित्या असं काही घडलं की, जी प्रतिक्रिया दिली जाते अगदी तसाच काहीसा प्रकार या एका फोटोमुळं घडल्याचं पाहायला मिळालं. 

हेही वाचा :  'आपले काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना..', रोहित पवारांना वेगळीच शंका; म्हणाले, 'विश्वासघात..'



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीचा विकास जोरात! AI मुळे उसाचे उत्पादन 30 टक्क्यांनी वाढले; देशातील पहिलाच प्रयोग

कैलास पुरी, झी 24 तास पुणे: बारामतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादन वाढवणारा यशस्वी …

बाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन; पुण्यातील FC रोडवर असलेल्या हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

Pune Crime News :  पुणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते इथे होत असलेल्या ड्रग्ज …