How To Keep Phone Cool In Summer: उन्हाळ्यात फोन खूप जास्त तापतो? या टिप्स आताच नोट करुन ठेवा

Overheating Phone In Summer: उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. कडक उन्हाळ्यामुळं घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत त्यामुळं नागरिक अस्वस्थ झाले आहेत. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यात पारा चाळीशीच्या पार गेला आहे. त्यामुळं नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे, असं आवाहन करण्यात येत आहे. उन्हाळ्यात आपण स्वतःची काळजी घेतोच. पण या दिवसांत आपल्या फोनचीही विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण उन्हामुळं फोन गरम होण्याच्या घटनाही सतत घडतात. काही ठिकाणी तर फोन गरम झाल्यामुळं बॅटरी फुटून अपघात झाल्याचंही समोर आलं आहे. 

उन्हाळ्यात फोनची काळजी कशी घ्यावी. या उष्णतेच्या काळात फोन कधी कधी खूप जास्त गरम होतो. मग तो अँड्रोइड असो किंवा आयफोन तापमान वाढल्यामुळं फोन ओव्हरहिट होऊ शकतो. त्यामुळं फोन स्लो होतो आणि बॅटरी लिकेजची समस्याही उद्भवू शकते. तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी या टिप्स तुम्हाला उपयोगी पडू शकतील. 

हेही वाचा :  सापाला दूध पिताना पाहिलं असेल, पण पाणी पिताना पाहिलंय का? पाहा व्हायरल व्हिडीओ

या 6 टिप्स लक्षात ठेवा 

1) फोन बॅगेत ठेवा

उन जास्त असेल किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत फोन खिशात ठेवणे टाळा. तुमच्या शरीरातील उष्णता आणि कडक उन्हाळा यामुळं तुमचा फोन जास्त तापू शकतो. त्यामुळं फोन एकतर तुमच्या बॅगेत ठेवा किंवा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करा

2) रिस्टार्ट करा 

फोन जास्त गरम झाला असेल तर थोडावेळ तो वापरु नका किंवा रिस्टार्ट करा. तसंच, फोनचे कव्हर काढून बाजूला ठेवा. त्यामुळं 

3) Airplane Mode

फोनमध्ये जास्त अॅप्स असतील तर बँकग्राउंड क्लिअर करा. गेम खेळणे, फोन करणे, बँकग्राउंडला एकापेक्षा जास्त अॅप्स असल्यास फोन स्लो होतो. तसंच, यामुळंही फोन लवकर गरम होतो. त्यामुळं शक्य झाल्यास फोन एअरप्लेन मोडवर ठेवा. 

4) कारमध्ये फोन ठेवू नका

जर तुमची कार उन्हातच पार्क केली असेल तर कारमध्ये फोन ठेवून जाऊ नका. पार्क केलेल्या कारमधील तापमान वाढू शकते. हे तापमान इतके असते की तुम्ही आरामात जेवण शिजवू शकता. आणि हे तापमान तुमच्या फोनसाठी योग्य नाहीये. 

5) फोन चार्ज करताना

फोन चार्ज होत असताना त्याखाली उशी किंवा ब्लॅकेट काहीच ठेवू नका यामुळं फोन जास्त गरम होण्याची शक्यता आहे. फोन चार्ज करताना ती जागा थंड आहे याची खात्री करुन घ्या. 

हेही वाचा :  तुमच्या फोनमध्येही नेटवर्कची समस्या आहे का? मग या 5 मार्गांचा वापर करा

6) फोनचे बॅकग्राउंड

भर उन्हात फोन वापरत असताना फोनचे बँकग्राउंड खूप जास्त हाय करतात. यामुळंही फोन जास्त तापतो. त्यामुळं शक्यता फोनचे स्क्रीन बॅकग्राउंड लो करुन ठेवा 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

20 जूनपासून बंद होतेय गुगलची ही सर्व्हिस, 4 वर्षांपूर्वीच झाली होती लाँच

Google One Vpn Service: गुगल क्रोम हा आपल्या रोजच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. गुगलने …

Google I/O 2024 Highlights: जबरदस्त! मानवी स्मरणशक्तीला शह देणार Google चं ‘हे’ टूल; हरवलेल्या गोष्टीही शोधणार

Google I/O 2024 : तंत्रज्ञान क्षेत्रात जग बरंच पुढे जात असतानाच गुगल, अॅपलसारख्या कंपन्यांकडूनही नवनवीन …