Gold price Hike : सोनं प्रचंड महागलं! दरवाढीमागे कारण काय? जाणून घ्या आजचा प्रतितोळा दर

Gold Silve Price Today News In Marathi : आज देशभरात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.  सोने-चांदीच्या किमती कमी-जास्त होतानाचा ट्रेंड या दोन महिन्यात दिसून आला. आठवड्याच्या सुरुवातीला आणि शेवटी सोन्याच्या किमती वधारताना दिसल्या आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वधारले असताना चांदीच्या ही दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने 900 रुपयांनी तर चांदी 1500 रुपयांनी महागली होती. 

ऐन लगनसराईत बाजारपेठेत सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे.  24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 64 हजार 600 रुपये होता. त्यात जीएसटी जोडल्यास ग्राहकांना प्रत्यक्ष खर्च 66 हजार 500 रुपये झाला असता. सोमवारी, 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जीएसटीसह 65,200 रुपये मोजावे लागतील. एकाच दिवसात 1,300 रुपयांनी वाढ झाली. सायंकाळी 66 हजार 500 रुपयांची नोंद झाल्यानंतर रात्री पुन्हा 300 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज (6 मार्च 2024) 64,460 रुपये आहे. तर सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, ते 73,240 रुपये प्रति किलोने विकले जात आहे. 

हेही वाचा :  बाईकवर 7 लोक बसले म्हणून पोलिसांनी थांबलं, 'हे' कारण देऊन त्याने सगळ्यांनाच चक्रावलं, पाहा व्हिडीओ

फेब्रुवारी महिन्यात सोन्याची सरासरी किंमत 62000 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच दर 65 हजार रुपयांवर पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. मागील सत्राच्या तुलनेत 800 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीची घास वाढली आहे. 900 रुपयांच्या वाढीसह चांदी 74,900 रुपये किलोवर पोहोचली आहे. गेल्या सत्रातच चांदी 74,000 रुपये प्रति किलोवर होती.

दरवाढी मागे कारण काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात, कॉमेक्स कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचा भाव सुमारे $2,110 प्रति औंस आहे. तो मागील ट्रेडिंग सत्रापेक्षा एक टक्का जास्त आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकन सेंट्रल बँक व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात किंवा मार्चच्या मध्यात चिन्हे दिसली असती. मात्र, जून महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल, या अपेक्षेने सोनीचे व्याजदर वाढताना दिसत आहेत. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये एमसीएक्समध्ये सोन्याचा भाव 2,400 रुपयांनी वाढला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.51 टक्क्यांनी वाढून 64,791 रुपयांवर बंद झाला. 

  • मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 59,088 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,088 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 64,460 रुपये आहे. 
  • नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 59,088 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 64,460 रुपये आहे. 
  • नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 59,088 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 64,460 रुपये आहे. 
हेही वाचा :  ग्राहकांनो चला खरेदीला! सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pre Wedding Cruise Party : बालपणाची मैत्री अन् आयुष्याचे साथीदार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लव्हस्टोरी माहितीये का?

Anant and Radhika celebrated pre wedding cruise party : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा …

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …