‘संभाजीनगरात अमित शाहांची सभा असली तरी उमेदवार शिवसेनेचाच राहील’; शिंदे गटाचा दावा

Chhatrapati Sambhaji Nagar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संभाजीनगरमध्ये संभाजीनगर लोकसभा आणि जालना लोकसभा जागेबाबत आढावा घेतला. अमित शहा रावसाहेब दानवे संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे या तिघांमध्ये जवळपास 25 मिनिटे ही बैठक चालली. संभाजीनगरची जागा भाजपला मिळणार अशा पद्धतीचे चर्चा सुरू आहे. त्या निमित्ताने भुमरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीनंतर ही जागा शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जरी संभाजीनगरमध्ये सभा घेत असले तरी ही सभा महायुतीसाठी आहे आणि संभाजीनगरचा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल भाजपचा नाही अशी स्पष्ट प्रतिक्रिया संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते संदीपान भुमरे यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर या जागेबाबत आणि दोन्ही पक्षांच्या ताकतीचा आढावा अमित शहा यांनी घेतला. संदीपन भुमरे आणि रावसाहेब दानवे यांच्या सोबत दोन्ही लोकसभेच्या जागांबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर संदिपान भुमरे समाधानी असल्याचे चित्र दिसलं. मात्र आता खरंच ही जागा भाजपाला सुटेल का की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाईल याबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलय. दरम्यान आजची ही सभा फक्त भाजपची नसून महायुतीची असल्यासे नेतेमंडळी सांगत आहेत.

हेही वाचा :  'उद्धव ठाकरेंच्या पायउताराचा बदला घ्या...' अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश

संदिपान भुमरे काय म्हणाले?

“ही जागा शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेनाच लढणार आहे. महायुतीचा उमेदवार निवडूण येण्यासाठी आणि अमित शाह हे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी हे सगळ्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. अमित शाह हे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली येथे सभा घेणार आहेत. त्या जागासुद्धा शिवसेनेचेच्या आहेत. काही राष्ट्रवादीच्या जागांवर नरेंद्र मोदी, अमित शाह सभा घेणार आहेत. कारण आपल्याला एक एक खासदार निवडूण आणून पंतप्रधान करायचे आहे. रणशिंग कुठून फुकायचं हे महत्त्वाचं नाही तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे हे महत्त्वाचे आहे.  आज आणि उद्याही सांगतो की ही जागा शिवसेनेचा लढणार,” असे संदिपान भुमरे यांनी म्हटलं.

“इथले लोक आम्हाला ही जागा पाहिजे असल्याचे म्हणताच म्हटल्यावर संदिपान भुमरे यांनी ही चर्चा सुरुच असते. मागणी करण्यात गैर काही नाही. आम्हीसुद्धा एखादी जागा मागू शकतो. शिवसेनेची जी पारंपारिक जागा आहे ती शिवसेनेचा जिंकणार. इथला उमेदवार महायुतीचाच निवडूण येणार. पालकमंत्री या नात्याने मी अमित शाह यांचे स्वागत केले. यावेळी बाकी राजकीय चर्चा झाल्या नाहीत,” असे संदिपान भुमरे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :  लंडनमध्ये शिक्षणासाठी गेला होता शेतकऱ्याचा मुलगा; महिन्याभराने नदीत सापडला मृतदेह



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..’; निलेश राणे संतापले

Chhagan Bhujabal Demanded For Seats: लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील मतदान अद्याप झालेलं नसतानाच दिवाळीच्या आसपास होणाऱ्या …

सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Price Today in Maharashtra: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र आहे. मंगळवारी …