घरात बसलेल्या महिला, तिच्या अल्पवयीन मुलीवर तरुणाचा प्राणघातक हल्ला

Bhandara Crime: घरातील मंडळ बसलेली असतात आणि अचानक कोणीतरी घरात घुसतो आणि धारदार शस्त्राने हल्ला करु लागतो. हल्ला करणाऱ्याला ना स्वत:च्या जीवाची पर्वा, ना दुसऱ्याच्या, अन् ना कायद्याचा धाक… भंडारामध्ये दिवसाढवळ्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. काय घडलाय हा प्रकार? जाणून घेऊया. 

 तुमसर शहरातील दुर्गा नगरात घटना घडली. घरात एक महिला तिच्या अल्पवयीन मुलीसोबत बसली होती. दरम्यान एका युवकाने अचानक घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताना त्याच्या हातात धारदार शस्त्र होते. त्याने ते शस्त्र महिलेच्या मानेवर फिरवले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने शेजारी बसलेल्या अल्पवयीन मुलीच्या पायावर जोरदार हल्ला चढवला. दोघींवरही त्याने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

सिमा धनंजय उके (45) असे महिलेचे नाव आहे. तर  दुर्गा असे 17 वर्षीय मुलीचे नाव आहे.  विश्वास चंद्रिकापुरे असे 25 वर्षीय आरोपीचे नाव असून तो कुभांरे नगर तुमसर येथील रहिवाशी आहे. सध्या आरोपी विश्वास हा फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याचे घर, मित्रपरिवार यांच्याकडे चौकशी सुरु केली आहे. 

हेही वाचा :  Kasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, 'या' नावांची आता चर्चा

आई,  मुलगी घरी बसली असता़ना अचानक आरोपीने त्यांच्या घरी प्रवेश करून धारदार शस्त्राने हल्ला केला. महिलेच्या मानेवर आणि अल्पवयीन मुलींच्या पायावर चाकूने हल्ला चढविला. यावेळी दोघीही खूप घाबरल्या. आई आणि मुलीने घराबाहेर पळ काढत आरडा ओरड केली. 

दोघी जिवाच्या आकांताने पळू आणि ओरडू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून माणसे गोळा झाली.दरम्यान या घटनेची माहिती गावभर पसरली.  बघता बघता नागरीकांची गर्दी झाली. 

दोघी जखमींना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आरोपी हा हल्ला करुन घटनास्थळावरुन पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हा हल्ला त्याने का केला? याचे कारण अद्याप समोर आले नाहीय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्था धाब्यावर! माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला… गुन्ह्यांमध्ये वाढ

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा आवाज कमी करायला सांगितल्याचा राग आल्याने तीन …

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …