शेन वॉर्नसाठी भारत राहिला कायमच खास; पदार्पणापासून ते आयपीएलच्या पहिल्या जेतेपदापर्यंत


क्रिकेट चाहत्यांसाठी एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न आता या जगात नाही. ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५२ वर्षीय वॉर्नचा थायलंडमधील कोह सामुई येथे मृत्यू झाला. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. १४५ कसोटी सामन्यात ७०८ बळी घेणाऱ्या जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या निधनाने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. वॉर्नने १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९३ विकेट घेतल्या होत्या. १९९२ मध्ये वॉर्न पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता.

शेन वॉर्नने एकूण १४५ कसोटी सामने खेळले. यादरम्यान वॉर्नने २५.४१ च्या सरासरीने ७९८ बळी घेतले, जे मुथय्या मुरलीधरन नंतर कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च आहेत. ७१ धावांत आठ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. वॉर्नने एका कसोटी डावात ३७ वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या. तसेच दहा वेळा त्याने कसोटी सामन्यात १० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या.

वॉर्नचा ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’

हेही वाचा :  प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटणची यूपी योद्धाशी गाठ

शेन वॉर्नने आपल्या १५ वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चेंडू टाकले. पण १९९३ च्या ऍशेस मालिकेत माईक गॅटिंगला टाकलेला चेंडू खूप खास होता. वॉर्नचा चेंडू लेग-स्टंपच्या बाहेर चांगला वळला होता आणि चेंडू वाइड असेल असे वाटत होते. गॅटिंगने तो खेळण्याचा प्रयत्न केला नाही. यादरम्यान, चेंडू वेगाने वळला आणि गॅटिंगला फसवत त्याच्या ऑफ स्टंपवर आदळला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ असे म्हटले जात होते.

पहिली कसोटी भारताविरुद्ध

जानेवारी १९९२ मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यातून वॉर्नने पदार्पण केले. वॉर्नने रवी शास्त्रीला पहिला बळी बनवले होते. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही आणि तो सातत्याने विक्रम करत होता. शेन वॉर्नने शेवटची कसोटी जानेवारी २००७ मध्ये खेळली होती. १९९९ मध्ये तो ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधारही बनला, पण त्याला कर्णधार होण्याची संधी मिळाली नाही.

The post शेन वॉर्नसाठी भारत राहिला कायमच खास; पदार्पणापासून ते आयपीएलच्या पहिल्या जेतेपदापर्यंत appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग पोटच्या लेकावर काढला; 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Woman Tossed Her Son: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत झालेल्या …