समुद्रात बुडणार मुंबईसह भारतातील ‘हे’ मोठं शहर; 2050 वर्ष उजाडण्याआधीच…

Big Natural Disaster in 2050 : सध्या वातावरमात कमालीचे बदल पहायला मिळत आहेत. वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.   2050 वर्ष हे भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. 2050 मध्ये भारतातील दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार असल्याची भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. क्लायमेट सेंट्रल या अमेरिकन संस्थेने 2019 मध्ये क्लायमेट चेंजबाबत मोठा दावा केला होता. भारतातील मुंबई आणि कोलकाता पूर्णपणे समुद्रात बुडणार आहेत. हवामान बदलाचा मोठा फटका बसणार आहे. क्लायमेट चेंजबाबतचा हा सर्वात मोठा दावा मानला जात आहे. भारतासह जगभारतील अनेक देश देखील पाण्याखाली जातील अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे.

भारतातील मुंबई आणि कोलकाता शहराला मोठा धोका

2050 मध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप होणार आहे. भारतातील मुंबई आणि कोलकाता ही दोन मोठी शहर समुद्रात बुडतील अशी भिती व्यक्त केली जात आहे. हवामान बदलामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. वातावरणातील बदलामुळे पृथ्वीवरील तापमानात कमालीचे बदल होत आहेत. हिमनद्या वितळू लागल्या आहेत.  मान्सूवर देखील याचा परिणाण पहायला मिळत आहे. मान्सूनचे वेळापत्रक बदलले आहे.  कधी पूर येतो तर कुठे दुष्काळ पडतोय. याच  हवामान बदलामुळे भारतातील मुंबई आणि कोलकाता ही शहरे 2050 पर्यंत पाण्यात बुडतील असा दावा संशोधकांनी केला आहे. जलद गतीने होणारे शहरीकरण यामुळे मुंबई आणि कोलकाता येथील किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना पुराचा सर्वाधिक धोका असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा :  अवैध धंद्याची पोलिसांना माहिती दिली, आरोपींनी बर्थ-डे पार्टीतच तरुणाला संपवले

मुंबई आणि कोलकाता सह भारतातील या शहरांना देखील धोका 

मुंबई आणि कोलकातासह भारतातील आणखी काही शहरांना समुद्रामुळे मोठा धोका निर्माण होणार आहे. सुरत, ओडिशा, केरळ, तामिळनाडू या शहरांचा धोकादायक यादीत समावेश आहे. 2050 पर्यंत समुद्र पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या 10 देशांच्या लोकसंख्येवर याचा प्रभाव होणार आहे. सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत भारत अव्वल स्थानी आहे. 

जगभरातील अनेक देशांना समुद्राचा धोका

फक्त भारतच नाही तर जगभरातील अनेक देशांना समुद्राचा धोका.  बांगलादेशातील 2.5 कोटी, चीनचे 2 कोटी आणि फिलिपाइन्सचे सुमारे 1.5 कोटी लोक यामुळे धोक्यात येणार आहेत. भारतातील मुंबई आणि कोलकाता, चीनमधील ग्वांगझू आणि शांघाय, बांगलादेशातील ढाका, म्यानमारमधील यंगून, थायलंडमधील बँकॉक आणि व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी आणि है फोंग या शहरांना धोक्याचा इशराा देण्यात आला आहे. कोट्यावधी लोक बेघर होण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे. 

5 शहरी आधीच बुडाली

हवामान बदलामुळे आतापर्यंत जगातील पाच शहरे समुद्राच्या पाण्यात पूर्णपणे बुडाली आहेत. या शहरांमध्ये मोठ्या लोकसंख्येने लोक राहात होते. इजिप्तमधील थॉनिस हेराक्लियन शहर, इटलीचे बाया शहर, इंग्लंडमधील डरवेंट गाव, जमैकाचे पोर्ट रॉयल आणि अर्जेंटिनामधील विला अपेक्युएन क्षेत्र ही पाच शहरे समुद्रात बुडाली आहेत.

हेही वाचा :  अजित पवार महाराष्ट्रातील एकमेव नेते; 3 वर्षांत 3 वेळा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …