VIDEO: काश्मीरी तरुणीने गाजवली ब्रिटनची संसद, जगासमोर पाकिस्तानला सुनावले खडे बोल

Yana mir on Pakistan: भारताविरोधात प्रपोगंडा चालवणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा जगासमोर खडे बोल ऐकावे लागले आहेत. काश्मीरमध्ये राहणारी पत्रकार याना मीरने पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. भारताविरोधात प्रपोगंडा चालवल्याबद्दल तिने पाकिस्तानला सुनावले आहे. ती ब्रिटनच्या संसदेत बोलत होती. यानंतर यानाच्या वक्तव्याचा व्हिडीओ देशभरात व्हायरल होतोय.

ब्रिटनच्या संसदेमध्ये बोलताना यानाने आपली तुलना मलाला यूसुफजईसोबत करणाऱ्या पाकिस्तानींना फटकारले. मी माझ्या देशात सुरक्षित आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. मी येथे स्वतंत्र आणि सुरक्षित आहे, असे यानाने म्हटले. यावेळी तिने तरुणांच्या विकासासाठी भारतीय सैन्य करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

काश्मीरी पत्रकार आणि कार्यकर्ता याना मीर या तरुणीला यूके पार्लिमेंटमध्ये आयोजित ‘संकल्प दिनी’ सन्मानित करण्यासाठी बोलावण्यात आले होते. जम्मू काश्मीरमधील विविधतेस प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नासाठी याना मीर हिला डायवर्सिटी एबेंसडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात ब्रिटनच्या संसदेसहित 100 हून अधिकजण सहभागी झाले होते. 

मी मलाला युसूफजई नाही, जिला दहशतवादी धमक्यांमुळे आपला देश सोडावा लागला. मी माझ्या भारत देशात स्वतंत्र आणि सुरक्षित आहे. मी माझी मातृभूमी काश्मीरमध्ये सुरक्षित आहे, जो भारताचा अविभाज्य भाग आहे. मला कधीच पळून जाऊन देशात शरण जाण्याची गरज लागली नाही. मी कधीच मलाला युसूफजई बनणार नाही. माझा देश आणि माझी मातृभूमी काश्मीरला शोषण करणारी म्हणणाऱ्या मलालाच्या वक्तव्यावर मला आक्षेप आहे. सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय मीडियाच्या असा सर्व टूलकिट सदस्यांवरही आक्षेप आहे. ज्यांनी कधीच काश्मीर जाण्याची पर्वा केली नाही पण त्याच्या शोषणाच्या कहाण्या रचत राहिले.

हेही वाचा :  Sanjay Raut : "राजभवनात घुसून राज्यपालांची बिस्किटं न खाता..."; संजय राऊतांनी भाजपला सुनावलं

तुम्ही धर्माच्या आधारवर भारताला विभागण्याचे काम बंद करा. आम्ही तुम्हाला कधीच याची परवानगी देणार नाही. सिलेक्टीव्ह प्रोपगंडा पसरवण बंद करा. माझ्या देशाच्या विरोधात काम करणारे जे पाकिस्तान आणि ब्रिटनमध्ये राहत आहेत, त्यांनी आंतरराष्ट्री मीडिया किंवा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मंचावरुन भारताला बदनाम करणं थांबवाव, असे आवाहन तिने केले. 

यावेळी तिने आंतरराष्ट्रीय मीडियावरदेखील निशाणा साधला. ब्रिटनच्या लिव्हिंग रुममधून रिपोर्टिंग करुन भारताला विभागण्याचा प्रयत्न बंद करा. दहशतवादामुळे काश्मीरच्या हजारो मातांनी आधीच आपली बालके गमावली आहेत. आमचा पाठलाग करणे बंद करा. काश्मीरी लोकांना शांतीने जगू द्या, असेही तिने सांगितले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा ‘तो’ मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा ‘लेटर बॉम्ब’मुळे खळबळ

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं …

Maharastra Politics : ‘तानाजी सावंत यांचा तातडीने राजीनामा घ्या, त्यांनी…’, रविंद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलिशान कारनं (Pune Porsche Accident) चिरडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार …