जेव्हा शेन वॉर्नने आपल्या एका चेंडूने जगाला केले होते थक्क; जाणून घ्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ बद्दल


मी असा चेंडू टाकू शकतो असे मला कधीच वाटले नव्हते, असे वॉर्नने म्हटले होते

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे शुक्रवारी  निधन झाले आहे. शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे त्याच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. १४५ कसोटी सामन्यात ७०८ बळी घेणाऱ्या जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या निधनाने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. वॉर्नने १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९३ विकेट घेतल्या होत्या. १९९२ मध्ये वॉर्न पहिल्यांदा प्रकाशझोतात आला.

शेन वॉर्नने १५ वर्षांपूर्वी शेवटचा कसोटी सामना खेळला होता, पण आजही या दिग्गज लेग-स्पिनरने टाकलेला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ क्रिकेट चाहत्यांसाठी संस्मरणीय आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ७०० हून अधिक बळी घेणारा शेन वॉर्न हा जगातील एकमेव लेगस्पिनर होता. वॉर्नने ३० वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे झालेल्या ऍशेस मालिकेतील कसोटी सामन्यात इंग्लंडचा फलंदाज माईक गॅटिंगने क्लीन बोल्ड करून जगाला थक्क केले होते. वॉर्नने टाकलेला जादूई चेंडू गॅटिंगच्या ऑफ-स्टंपवर आदळण्याआधी ९० अंशात वळला होता.

हेही वाचा :  म्हणून आईने पोटच्या मुलीला संपवलं! नाशिकमधल्या चिमुरडीच्या हत्येचं गुढ उकललं... मन सुन्न करणारं कारण

शेन वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्ध सिडनी येथे कसोटी पदार्पण केले होते. पहिल्या कसोटीत तो फार काही करू शकला नाही आणि फक्त एक विकेट घेऊ शकला. १९९३ च्या ऍशेस मालिकेपूर्वी, वॉर्न ११ कसोटीत ३२ बळी घेत सरासरी लेग-स्पिनर मानला जात होता. वॉर्नने १९९२च्या बॉक्सिंग-डे कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध ७/५२ धावा केल्या होत्या.

दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन

वॉर्नचा खरा खेळ १९९३ च्या ऍशेस मालिकेत समोर आला. त्याने पहिल्या अॅशेस मालिकेत पाच कसोटी सामन्यात २९ विकेट्स घेतल्या. १९९३ च्या ऍशेस कसोटीच्या पहिल्या षटकात, वॉर्नने खेळपट्टीचा फायदा घेतला आणि माईक गॅटिंगच्या लेग-स्टंपच्या बाहेर खेळपट्टीवर खेळलेला एक सुरेख लेग स्पिन टाकला, पण तो ऑफ-स्टंपवर आदळला.

एका मुलाखतीत शेन वॉर्नने सांगितले होते की, मी असा चेंडू टाकू शकतो असे मला कधीच वाटले नव्हते. मी फक्त लेगब्रेक टाकण्याचा प्रयत्न करत होता, पण चेंडू ९० अंशात फिरला. ते अविश्वसनीय होते. वॉर्नने ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ हा त्याच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असल्याचेही सांगितले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …