शिवजयंतीसाठी रायगडावर आलेले दोन तरुण हिरकणी कड्यावर अडकले; डोंगरउतार पाहून काळजात धस्स होईल!

Raigad News: स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवभक्त राज्यातील विविध गडांना भेट देतात. शिवजयंतीनिमित्त आज अनेक शिवप्रेमी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर पोहोचले आहेत. मात्र, रायगडावर एक दुर्घटना घडली आहे. रायगडाच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले आहेत. 

शिवजयंती निमित्त आज लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर आले आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवभक्त आले आहेत. शिवजयंती निमित्त किल्ले रायगडावर गेलेले दोन तरुण हिरकणी कड्यावर अडकले आहेत. तरुणांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. 

रोपवेच्या मार्गावरुन जात असताना काही स्थानिकांनी या तरुणांना हिरकणी कड्यावर अडकलेले पाहिले. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाली. गडावर परत जाणे किंवा खाली उतरणे कठिण असल्याने एका दगडाचा आधार घेत दोघेही एकाठिकाणी जीव मुठीत घेऊन थांबले आहेत. हिरकणी कड्यावर अडकल्याने दोघा तरुणांनी रुमालाच्या इशाऱ्याने लोकांचे लक्ष वळवण्याचे प्रयत्न केले. तसंच आरडाओरडा करत सुटका करण्यासाठी साकडे घालत आहे. तरुणांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. मात्र, तोपर्यंत या तरुणांच्या सुटकेसाठी दुसरा कोणतातरी पर्याय शोधण्यात येत आहे. 

हेही वाचा :  विद्यार्थ्यांना सुट्टी लागताच शिक्षिका झाल्या झिंगाट, नाचून व्यक्त केला आनंद; Video Viral

दोघे तरुण शिवजंयतीसाठी रायगडावर आले होते. रोपवेच्या मार्गावरुन जाताना स्थानिकांनी दोघांना पाहिले त्यानंतर एकच गोंधळ उडाला. हिरकणी कड्याची वाट ही अत्यंत अवघड आणि किचकट आहे. अशा परिस्थितीत दोघेही तरुण एका दगडाचा आधार घेऊन एकाच ठिकाणी थांबले आहेत. तरुणांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. महाडमधील दोन टीम आहेत त्यातील एका टीमला बोलवण्यात आले आहे. 

रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले असून अद्याप तरी एकही टीम तिथे पोहोचलेली नाहीये. त्यामुळं बचावकार्य सुरू झालेले नाहीये. स्थानिक लोक त्यांना इशारा करुन वेगवेगळे पर्याय सुचवत आहेत. मात्र, स्थानिकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळं त्यांना नेमकं काय करावं हे लक्षात येत नाहीये. जोपर्यंत रेस्क्यू टीम येत नाही आणि वरुन दोर टाकून त्यांना सोडवले जात नाही, तोपर्यंत त्यांची सुटका होईल असं वाटत नसल्याचे मत स्थानिकांनी नोंदवले आहे. 

शिवजयंतीसाठी हे दोन्ही तरुण रायगडावर आले होते. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा अवलंब त्यांनी केला. मात्र, याच मार्गामुळं ते अडचणीत सापडले आहेत. नसत धाडस या तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …