जिथे सागरा ज्वालामुखी मिळतो! समुद्राच्या खवळच्या पाण्यात पडतोय धगधगता लाव्हा, पाहा Video

Viral Video News : ‘जिथे सागरा धरणी मिळते…’ हे सुमधूर गीत आपण अनेकदा ऐकलं असेल. या गीताचे शब्द आणि त्याचे सूर नेहमीच मनाचा ठाव घेतात. या गीतातील शब्दांप्रमाणं एखादं दृश्यही अनेकांनी पाहिलच असेल. पण, तुम्हाला माहितीये का याच शब्दांमध्ये काहीसा बदल केल्यास म्हणजे ‘जिथे सागरा ज्वालामुखी मिळतो!’ असं म्हटल्यास एक आश्चर्यचकित करणारं वास्तव समोर येतं. 

विश्वास, बसत नाहीये? 

सोशल मीडियावर दर दिवशी, प्रत्येक मिनिटाला असंख्य फोटो, व्हिडीओ शेअर होत असतात. यापैकी बऱ्याच पोस्ट इतक्या व्हायरल होतात की त्यामुळं नेटकऱ्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचते. अशीच एक व्हायरल होणारी पोस्ट तुम्हीसुद्धा पाहा. 

ही दृश्य पाहून काही लक्षात येतंय का? जगाच्या पाठीवर एक अशी जागा आहे जिथे सागरा ज्वालामुखी मिळतो! X या सोशल मीडियावरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला ही भारावणारी दृश्य पाहता येत आहेत. या दृश्यामध्ये समुद्राच्या खवळच्या आणि डोंगराच्या कातळकड्यावर आदळणाऱ्या अजस्त्र लाटांमध्ये डोंगरकड्यावरून चक्क धगधगता लाव्हारस पडताना दिसत आहे. 

अतिशय तप्त असा हा लालबुंद लाव्हारस जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतो आणि खाऱ्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तिथं स्फोटासारखा ध्वनी निर्माण होऊन तिथं धुराचे लोट तयार होतात आणि एक अदभूत नजारा निसर्गाचा एक चमत्कारच सर्वांना पाहायला मिळतो असं या काही सेकंदांच्या व्हिडीओतून स्पष्टपणे दिसत आहे. 

पॅसिफिक समुद्र परिसरामध्ये नैसर्गिकरित्या होणाऱ्या या कृतीला फायरहोज असं म्हणतात. या प्रक्रियेमध्ये एक प्रवाह लावारसाला बाहेरच्या बाजुला फेकतो. काही वर्षांपूर्वी हे प्रमाण अतिशय कमी स्वरुपात होतं. पण, अलिकडेच त्याची तीव्रता भीतीदायकरित्या वाढली आहे हे नाकारता येत नाही. सध्या पॅसिफिक महासागराती बिग आयलंड येथे हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करताना दिसत आहेत. पण, जाणकार आणि अभ्यासकांच्या मते या लाव्हारस आणि लाटांच्या एकत्रिकरणामुळं तयार होणारा धूर मात्र मानवी आरोग्यास घातक असल्यामुळं इथं जाणं टाळावं असं आवाहन करण्यात येत आहे. सध्या इथं लाव्हारसामुळं डोंगरकड्याला मोठी भेग पडत असून, कधीही हा कडा कोसळण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा :  बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल 'पवार लेडीज'



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, ‘मंत्री महोदयांच्या दबावामुळे..’

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन …

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …