आयपीएलच्या सुरूवातीला राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नवर लावली होती सर्वात मोठी बोली   

Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉर्न यांचं निधन  झाले आहे.  आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दित शेन वॉर्न यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ऑस्ट्रिलियन संघालाही त्यांनी अनेक सामन्यांमध्ये यश मिळवून दिले आहे. शिवाय आयपीएलमध्येही शेन वॉर्न यांनी महत्वपूर्ण कामगिरी कोली होती.  2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्न यांच्यावर सर्वात मोठी बोली लावली होती. 

एप्रिल 2008 पासून आयपीएलच्या स्पर्धा खेळण्यास सुरूवात झाली. त्याआधी फेब्रुवारीमध्ये खेळाडूंचा लिलाव झाला होता. या लिलावात केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केलेल्या खेळाडूंवरच बोली लावण्यात आली होती. तर लिलावापूर्वी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग यांना ‘आयकॉन प्लेयर्स’ म्हणून फ्रँचायझींचा भाग बनवण्यात आले होते. याचवेळी राजस्थानने शेन वॉर्न यांच्यावर सर्वात मोठी बोली लावली होती. 

2008 ला शेन वॉर्न यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु, लेगस्पिनच्या या जादूगाराला विकत घेण्यासाठी अनेक संघ उत्सुकत होते. लीगची सर्वात स्वस्त फ्रेंचायझी असलेल्या राजस्थान रॉयल्सने 4 लाख 50 हजार डॉलर्सच्या बोलीसह शेन वॉर्नला आपल्या संघात सहभागी करून घेतले होते.एवढेच नाही तर राजस्थानने त्यांना आपल्या संघाचा कर्णधार बनवले होते. 
 
आयपीएलचा पहिला हंगाम सुरू झाला होता, त्यावेळी राजस्थान रॉयल्सच्या संघाला सर्वात कमकुवत संघ मानला जात होता. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ, भारतीय फलंदाज मोहम्मद कैफ, अष्टपैलू युसूफ पठाण यांच्याशिवाय इतर कोणीही संघात सुपरस्टार नव्हता. परंतु, शेन वॉर्नच्या सक्षम कर्णधारपदाच्या कामगिरीवर संघाने अंतिम फेरीत घडक मारली होती. त्यानंतर या स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले. तर राजस्थान रॉयल्सला उपविजेते पद मिळाले. 

हेही वाचा :  'तुम्ही सूर्यकुमारवर जास्त...'; माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाला इशारा

महत्वाच्या बातम्या

Shane Warne Passes Away : फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …