शिक्षकांनी दाखवली टॉपर मुलाची उत्तरपत्रिका, पैकीच्या पैकी मार्क… तुमच्या मुलांनाही हा Video दाखवा

Viral Video : नवीन वर्षाचा जानेवारी महिना संपलाय आणि आता फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झालीय. या बरोबरच शाळा-कॉलेजच्या परीक्षांची (Exam) चाहूलही लागलीय. शाळेतलं, घरातलं वातावरण परीक्षामय झालंय. परीक्षेला अवघा एक महिना राहिल्याने विद्यार्थी अभ्यासात मग्न झालेत. ज्या घरातील मुलं दहावी-बारावीला (SSC-HSC) आहेत, त्या घरातील वातावरण तर एकदम तणावाचं बनलंय. घरात टीव्ही बंद झालेत, मुलं केवळ जेवणासाठी रुममधून बाहेर पडताना दिसतायत. खेळाची जागा अभ्यासाने घेतली आहे. बोर्डाची परीक्षा (Board Exam 2024) प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाची असते. याच निकालावर विद्यार्थ्याचं भविष्य अवलंबून असतं. 

पण चांगले गुण मिळवण्यासाठी केवळ चांगला अभ्यास करुन परीक्षेत उत्तर लिहिणं हा एकच मार्ग नाहीए. तर उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याच्या लिखाणाची पद्धत कशी आहे यावरही गुण दिले जातात. याच संदर्भात सोशल मीडियावर एका हुशार विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक शिक्षक एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासत असून त्या विद्यार्थ्याने कशी पद्धतीने उत्तर लिहिली आहेत, हे दाखवलं आहे. हा व्हिडिओ पाहून लोकं त्या विद्यार्थ्याचं कौतुक करतायत.

उत्तरं लिहिण्याची योग्य पद्धत
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत शिक्षकाने दाखवलेली उत्तरपत्रिका पाहून युजर्स थक्क झालीत. या विद्यार्थ्याने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी योग्य पद्धतीने आणि सुंदर हस्ताक्षरात लिहिलीत. उत्तर पत्रिकेच्या प्रत्येक पानाच्या वर काळ्या पेनाने प्रश्नाचं हेडिंग लिहिलं आहे. त्यानंतर निळ्या पेनाने प्रश्नांच सविस्तर उत्तर लिहिलेलं दिसतंय. पानावर कुठेही खाडाखोड नाहीए. सुंदर हस्ताक्षरात एका प्रश्नाचं उत्तर एका पानावर लिहिलेलं आहे. पानावर उत्तरं लिहिताने त्याने समासही सोडला आहे. ही उत्तर पत्रिका पाहून शिक्षकाने पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. 

विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या टीप्स
या व्हिडिओवरुन एक गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे उत्तरपत्रिका सादर करण्याचं कौशल्य. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेला अभ्यास परीक्षेच्यी तीन तासात उत्तरपत्रिकेवर उतरतो. त्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स

हेही वाचा :  RD Interest Rates: बँक की पोस्ट ऑफिस; आरडीवर सर्वाधिक व्याज कोण देतं?

1 – सर्वात आधी प्रश्नपत्रिका नीट वाचून घ्यावी. उत्तरं सुंदर हस्ताक्षर आणि सुटसुटीत लिहावीत. सुदंर अक्षरात लिहिलेले असेल तर चांगलं इंप्रेशन पडतं

2 –  बोर्ड परीक्षेच्याधी विद्यार्थ्याने तीन तासांचा वेळ लावून सराव पेपर सोडवाते. यामुळे भीती कमी होण्यास मदत होते तसंच पेपर लिहिण्याचा आपला वेग किती आहे याचा अंदाज येतो.

3 –  प्रश्नाची उत्तरं थोडक्यात लीहण्यापेक्षा प्रश्नाची गरज किती हे ओळखून लिहा.

4 – उत्तर लिहिताना एखादं वाक्य चुकलं तर ते एक बारीक रेष मारून ते खोडावं. त्यावर गिरवत बसू नका.

5 . जिथे शक्य असतील तिथे त्या गोष्टिशी संलग्न अशी उदाहरणे देण्याचा प्रयत्न करा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भाव

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला …

Pune Porshce Accident : ‘व्हायरल होणारा तो व्हिडीओ खोटा’, अल्पवयीन मुलाची आई हात जोडून म्हणाली…

Pune Porsche Car Accident Mother Reaction : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात …