निखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार प्रदान… एक नजर त्यांच्या कारकिर्दीवर!

Kolhapur News : पुरस्कार म्हणजे कामाची पोचपावती आणि पाठीवर मिळणारी शाबासकीची थाप. असाच एक मानाचा पुरस्कार निखिल वाघ यांना प्रदान करण्यात आला. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई यांच्या वतीने महागौरव 2024 हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी कोल्हापुरातील कणेरी मठ येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. 

जनसंपर्क आणि पत्रकारितेतील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची उपस्थिती पाहायला मिळाली. निखिल वाघ यांनी 2011 मध्ये गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) चे PRO- जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. याआधी, त्यांना प्रतिष्ठित नॅशनल मीडिया हाऊसमध्ये विविध पदांवर काम करण्याचा सात वर्षांचा अनुभव होता. साधारण 19 वर्षांचा मोठा अनुभव हाताशी घेऊन ते सध्या गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये सेवेत आहेत. ही सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. 

अलीकडेच निखिल वाघ यांना भारतीय जनसंपर्क परिषदेकडून प्रतिष्ठित ‘प्रॉमिसिंग पीआर पर्सन ऑफ द इयर’ चाणक्य पुरस्कार 2023 मिळाला. निखिल वाघ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथून जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयात मास्टर ऑफ आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केले आहे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथून जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयात कला शाखेची पदवी आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर महाराष्ट्र येथून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. 

हेही वाचा :  proud to be a pakistani... इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणाला अटक; मेडिकलचा विद्यार्थी

 

निखिल वाघ यांनी 2004-2007 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे दैनिक लोकमत महाराष्ट्र मधून सिटी रिपोर्टर म्हणून आपल्या पत्रकारितेच्या करिअरला सुरुवात केली. प्रिंट मीडियामधील अनुभवानंतर त्यांनी एबीपी माझा मुंबई (पूर्वी स्टार माझा म्हणून ओळखले जाणारे) मध्ये 2007-2011 पासून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये संपादकीय विभागात सहयोगी निर्माता म्हणून काम केले.

लोकमत आणि एबीपी माझा सारख्या मुख्य प्रवाहातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधील प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव घेतल्यानंतर, 2011 मध्ये ते GSL- Goa Shipyard Limited मध्ये सामील झाले. गोवा शिपयार्ड लिमिटेड ही भारत सरकारमधील संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त कंपनी आहे.  GSL मधील 12 वर्षांच्या दीर्घ करिअरमध्ये, त्यांनी PR विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि संस्थेची  प्रतिमा निर्माण करणे आणि संस्थेची प्रतिष्ठा वाढवणे, विविध संप्रेषण धोरणे यांच्याशी संबंध निर्माण करणे आणि टिकवून ठेवणे या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंच

Trending News: लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन नव्हे तर एका लग्नामुळं दोन कुटुंबदेखील एकत्र येत …

राजेश खन्नांची ‘ती’ हिरोईन जिची सावत्र वडिलांनीच केली हत्या; आत्ता 13 वर्षांनी…

Laila Khan Murder Case: अभिनेत्री लैला खान प्रकरणा तब्बल 13 वर्षानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. …