पुणेकरांसाठी Good News! जिल्ह्यात लवकरच तिसरी महानगरपालिका; अशी असेल रचना

Third Municipal Corporation in Pune: पुणे शहराबरोबरच जिल्ह्यातील लोकसंख्या मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात झालं असून लोकसंख्येची घनता वाढली आहे. त्यामुळेच पुणे जिल्ह्यात पुणे शहर महानगर महापालिकेपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिका तयार करण्यात आली. मात्र आता या 2 महानगरपालिकांनंतरही वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवीन महानगरपालिका तयार केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडपाठोपाठ तिसऱ्या महापालिकेची स्थापना होणार आहे. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि राजगुरू नगरपरिषदेच्या हद्दीतील भागाबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील गावांचा समावेश करुन नवीन महापालिका निर्माण केली जाणार आहे. याबाबतच्या हलचाली सुरु झाल्या असून संबंधित विषयासंदर्भात अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून राज्य शासनाने अहवाल मागविला असून याबद्दलच कामही सुरु झालं आहे.

…म्हणून नवीन महानगरपालिका

पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश करण्यात आला आहे. मागील काही काळामध्ये या दोन्ही महापालिकांची हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे आता या पुढे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या परिसरातील नवीन गावांचा समावेश केला जाणार नाही. या दोन्ही महापालिकेत नव्याने गावांचा समावेश करणे प्रशासकीय दृष्ट्याही अचडणीचे ठरणार असल्याने हा निर्णय योग्य ठरणार नाही. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करण्याबाबतची मागणी होत आहे. चाकण, आळंदी आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या परिसरालगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून ही नवीन स्वतंत्र महापालिका करण्याचा विचार राज्य शासनाकडून केला जात आहे.

हेही वाचा :  वादा तोच पण, दादा नवा...! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकले बॅनर, पुण्याचा नवा दादा कोण?

माहिती गोळा करण्यास सुरुवात

या नव्या महानगरपालिकेच्या निर्मितीसंदर्भातील प्राथमिक चाचपणी करण्यासाठी चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या भागांबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याबाबतचा तपशिल गोळा केला जात आहे. जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका आयुक्त आणि चाकण, आळंदी, राजगुरू नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे अहवाल मागून घेण्यात आला आहे. तिन्ही नगरपरिषदेतील हद्दीची एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबतचे हे अहवाल मागवून घेण्याबरोबरच अभिप्रायासह शासनाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडूनही अहवाल मागविला आहे.

1986 सालापासून आहे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

देशातली सर्वात श्रीमंत नगरपालिकांमध्ये समावेश होणाऱ्या पिंपरी-चिंचवड नगरपालिका 1986 साली महानगरपालिका झाली. त्यानंतर शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालू लागले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मुख्यालय पिंपरी येथे आहे. तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 साली स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे शहरात महानगरपालिकेची स्थापना झाली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पत्नी मारहाण करते, पुरेसं जेवणही देत नाही; माजी मंत्र्याच्या आरोपांमुळे खळबळ; मुलगा म्हणाला ‘त्यांना…’

राजस्थानचे माजी मंत्री आणि भरतपूरच्या राजघराण्यातील सदस्य विश्वेंद्र सिंह यांनी पत्नी आणि मुलाविरोधात गंभीर आरोप …

MPSC परिक्षेत अंध मालाचे प्रकाशमय यश! 20 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या अनाथ मुलीने इतिहास घडला

अनिरुद्ध दवाळे, अमरावती, झी मीडिया : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या अमरावतीतल्या माला पापळकर या तरुणीने …