Toyota Glanza 2022 चा कंपनीने जारी केला टीझर, जाणून घ्या फिचर्स आणि डिझाईन


टोयोटा मोटर्स आपली लोकप्रिय हॅचबॅक टोयोटा ग्लान्झा भारतात नवीन फिचर्स आणि डिझाइनसह लाँच करणार आहे. टोयोटा कंपनीने ग्लान्झा या कारचा टीझर जारी केला आहे. यातून कारचे डिझाईन आणि इंटीरियर याची माहिती मिळते. कंपनीने या कारला नवीन टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिले आहे. यात व्हॉईस असिस्टन्ससह नवीन डिझाईन आहे. याशिवाय, कंपनीने या कारचा एसी देखील बदलला आहे, तर एसी व्हेंट टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमच्या खाली देण्यात आला आहे, ज्यामुळे कारच्या इंटिरिअर आणखीन आकर्षक दिसते. कंपनीने या नवीन टोयोटा ग्लॅन्झाच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. तज्ज्ञांच्या मते, ८ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच होऊ शकते.

कारच्या इंटिरिअरमध्ये कंपनीने या कारच्या डॅशबोर्डचा सेंट्रल लेयर पियानो ब्लॅक फिनिशसह दिला आहे. डॅशबोर्डच्या खालच्या भागाला वेगवेगळ्या रंगसंगती देण्यात आल्या आहेत. डॅशबोर्ड ड्युअल टोनसह दिलेला आहे. ही कार वैशिष्ट्ये आणि डिझाइनच्या बाबतीत अगदी वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आली आहे. या कारच्या इंजिनबद्दल सांगायचे तर, कंपनी या कारमध्ये १.२ लीटर ड्युअल जेट मायलेज हायब्रिड इंजिन देणार आहे. जे ८३ पीएस पॉवर आणि ११३ एनएम पीक टॉर्क जनरेट करेल आणि त्यासोबत ५ स्पीड मॅन्युअल आणि ४ स्पीड एएमटीचा गिअरबॉक्सचा पर्याय असेल.

हेही वाचा :  top 5 electric cars sold in india know on which position tata nexon and tigor prp 93'या' आहेत देशात विकल्या जाणाऱ्या टॉप ५ इलेक्ट्रिक कार |

फीचर्सबद्दल बोलायचे तर, यात ऑटो एसी, ऑटो क्लायमेट कंट्रोल, एबीएस, ईबीडी, आयएसओ फिक्स्ड चाइल्ड सीट अँकर रीअर पार्किंग सेन्सर, नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह फीचर्स आहेत. ते अपडेट केले जाऊ शकतात. हॅचबॅक सेगमेंटमध्ये लाँच केल्यानंतर टोयोटा ग्लान्झा थेट मारुती बलेनो २०२२, ह्युंदाई i20 सारख्या कारशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहे.

The post Toyota Glanza 2022 चा कंपनीने जारी केला टीझर, जाणून घ्या फिचर्स आणि डिझाईन appeared first on Loksatta.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …