राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षा वेळापत्रक आले ; असे आहे राज्यसेवा परीक्षेचे वेळापत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षा वेळापत्रक आले असून आयोगाने केवळ २०५ जागांसाठी जाहिरात काढली आहे. आहे. नवा अभ्यासक्रम लागू होण्यापूर्वी एसपीएससीने जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारे जास्त संधी देण्याची अपेक्षा असताना २०२४ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी केवळ २०५ जागा काढण्यात आल्या आहेत. यामुळे एमपीएससीचा रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमांसाठी ही शेवटची संधी असल्यामुळे तीव्र स्पर्धा होणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे एमपीएससी परीक्षा देणारे लाखो विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नवा अभ्यासक्रम २०२५ पासून
एमपीएससीने नवा अभ्यासक्रम लागू केला होता. परंतु वर्षानुवर्ष विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमाने अभ्यास करत होते. अचानक नवीन अभ्यासक्रम लागू केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी पुणे शहरातून आंदोलन सुरु केले. २०२३ च्या सुरुवातीला झालेल्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनास आमदार रोहित पवार यांनी पाठबळ दिले. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम लागू केला. नवा अभ्यासक्रम लागू होण्यापूर्वी एसपीएससीने जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारे जास्त संधी देण्याची अपेक्षा असताना २०२४ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी केवळ २०५ जागा काढण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :  Indian Navy Recruitment 2023 – Opening for 224 SSC Officers Entry Posts | Apply Online

३२ संवर्गांपैकी केवळ १२ संवर्गांचा परीक्षा
आयोगाकडून एकूण ३२ संवर्गासाठी परीक्षा घेतल्या जातात. परंतु आता काढलेल्या जाहिरातीत केवळ १२ संवर्ग दिले आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलिस उपाधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक या महत्त्वाची पदेच नाहीत. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे.

असे आहे राज्यसेवा परीक्षेचे वेळापत्रक
सामान्य प्रशासन विभागातील २०५ पदांसाठी परीक्षा १४ ते १६ डिसेंबर २०२४ दरम्यान होणार आहे.
राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सेवा विभागातील २६ पदांसाठी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी परीक्षा होणार आहे.
राज्यसेवेच्या वनसेवा महसूल व वनविभागसाठी ४३ पदे आहेत. ही परीक्षा २८ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्या होणार आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती

ICF Recruitment 2024 इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन …

आश्रमशाळेतील मुलगा ते आय.ए.एस अधिकारी; मजूराच्या मुलाची ही यशोगाथा!

UPSC IAS Success Story : मजूरांचे आयुष्य हे पूर्णतः स्थलांतरित होत असते. ज्या ठिकाणी पोटाची …