केस उपटून काढले, कानाचा पडदा फाटला; मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीकडून घरगुती हिंसाचाराचा आरोप

लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा याच्या विरोधात सेक्टर 126 मध्ये पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेच्या भावाने एफआयआर दाखल केली आहे. विवेक बिंद्रा याच्याकडून पत्नीला मारहाण झाल्यानंतर अनेक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर पत्नीच्या कानाचा पडदा देखील फाटला आहे. विवेक बिंद्रा याच्या विरोधात 14 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंद्राची पत्नी यानिकाचा भाऊ वैभव क्वात्रा यांनी तक्रार दाखल केली होती, ज्याने दावा केला होता की, ही घटना ते राहत असलेल्या नोएडा येथील सेक्टर 94 मधील सुपरनोव्हा वेस्ट रेसिडेन्सी येथे घडली. 7 डिसेंबरला सकाळी बिंद्रा आणि त्याची आई प्रभा यांच्यात जोरदार वाद झाला. यानिका मध्यस्थी करण्यासाठी पुढे आली असता बिंद्राने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे यानिकाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विवेक बिंद्राचा पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा व्हिडिओही समोर आला आहे. यानिकाला एवढी मारहाण करण्यात आली की तिच्या कानाचा पडदाही फाटला, असा आरोप आहे. पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत. बिंद्रा बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड (BBPL) चे सीईओ आहेत आणि त्यांना यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात.

हेही वाचा :  कौर्याची परिसीमा गाठली, आधी डोक्यात दगड घातला , नंतर 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केला

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अलीकडेच, YouTuber संदीप माहेश्वरीने त्याच्या YouTube चॅनेलवर “बिग स्कॅम एक्सपोज” नावाचा व्हिडिओ जारी केला. ज्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी बिंद्रच्या कंपनीकडून फसवणूक झाल्याचा दावा केला होता. मात्र, बिंद्राने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

कसा सुरु झाला वाद?

एका घोटाळ्यावरून दोन युट्युबर्समधील वाद सुरू झाला. 11 डिसेंबर रोजी संदीप माहेश्वरी यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘मोठा घोटाळा’ उघड केल्याचा दावा केला आहे. व्हिडिओमध्ये ते शिकवण्याच्या व्यवसायाच्या नावाखाली लोक हजारो रुपयांचे कोर्सेस विकत असल्याबद्दल बोलत होते. त्यांनी याला मोठा घोटाळा म्हटले आहे. व्हिडिओमध्ये तो दोन मुलांशी बोलत आहे. एक मुलगा सांगतो की, त्याने एका मोठ्या यूट्यूबरकडून 50 हजार रुपयांना कोर्स विकत घेतला, तर दुसरा म्हणतो की, त्या बदल्यात त्याने 35 हजार रुपये दिले. मुलांनी सांगितले की, त्यांना हा कोर्स इतर लोकांना विकण्यास सांगितले जाते, हे एक प्रकारचे मल्टी लेव्हल मार्केटिंग आहे. यानंतर संदीप माहेश्वरी यांनी हा एक प्रकारचा घोटाळा असल्याचे सांगत हा प्रकार थांबवावा, असे सांगितले. मात्र, या 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणत्याही बिझनेस गुरूचे नाव घेतले नाही.

हेही वाचा :  'या' पक्षाला वोट देणं मुस्लिम महिलेला पडलं महागात, नक्की काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्था धाब्यावर! माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला… गुन्ह्यांमध्ये वाढ

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा आवाज कमी करायला सांगितल्याचा राग आल्याने तीन …

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …