मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचा मास्टर प्लान! जरांगे यांचा विरोध

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने मास्टर प्लान तयार केला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईत हे विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरु असल्याचं कळतंय. मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांंचा याला विरोध आहे. 

विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकार मुंबईत विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे. तर, जरांगेंनी मात्र विशेष अधिवेशनाला विरोध केलाय. याच अधिवेशनाला मुदतवाढ देऊन आरक्षणाचा कायदा पारित करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याला विरोध दर्शवलाय. याच अधिवेशनाची मुदत वाढवून आम्हाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या,नाही तर 23 तारखेला आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करावी लागेल, असा ईशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मराठा समाज आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागास राहिला. कोणत्याही समाज तेढ वाढू येवू नये ही सरकारची भूमिका आहे.  महाराष्ट्रात तणाव वाढणार नाही आपली सगळ्याची जबाबदारी आहे. मराठा समाजला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल. यावरुन राजकारण होता कामा नये. राजकीय पोळी भाजू नये. काही अपप्रवृतीने फायदा घेऊ नये. याची खबदारी आपणांस घ्यावी लागेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले. मराठा समाजला आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध आहे. मराठा समाज आरक्षण संदर्भात सर् पक्षीय बैठक बोलवली. स्वतः उपोषणस्थळी गेलो.  कुणबी दाखले देण्याचा जीआर जुनाच, दाखले द्यायची प्रक्रिया सुरू केली. काही मतमतांतर असू शकते, ओबीसी काढून कोणाला द्यायचे नाही. ओबीसी धक्का न लावता आरक्षण देणार असे अश्वासन मुखंयमंत्री शिंदे यांनी दिले. 

हेही वाचा :  सरकार दुश्मन आहे, अशा भूमिकेत काम करण्याचं काही कारण नाही - चंद्रकांत पाटील

कुणबी लिहीले आणि प्रमाणपत्र घेतले इतके सोपे नाही. खोटे काही केले तर  शिक्षा, कारवास होईल. मुळ कायद्यात कोणता ही बदल न करता नोंदी तपासण्याचे काम केले जात आहे.  ⁠सर्व कागदपत्रे पब्लिक डोमेनमध्ये ठेवली आहेत. सक्षम प्राधिकरणाने खोट प्रमाणपत्र दिले तर त्या अधिकाऱ्याला सहा महिने किंवा दंड अशी शिक्षा होते.⁠ त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देण सोप नाही.⁠ त्यामुळे कोणीही काळजी करु नये. जो पात्र आहे त्याला दाखला सुलभपणे दिला जातो असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …