Redmi Note : 200MP चा कॅमेरा असलेला स्वस्त फोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Xiaomi ने भारतात Redmi Note 12 ने सीरीज लॉंच केली आहे. या Redmi Note 12 अंतर्गत तीन फोन लॉन्च करण्यात आले आहेत. ज्यामध्ये Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ भारतात लॉन्च केले आहेत.  यामध्ये Redmi Note 12 ची सुरूवातीची किंमत 17,999 आहे. Redmi Note 12 Pro+ ची सुरूवातीची किंमत 29,999 आणि Redmi Note 12 pro ची  सुरूवातीची किंमत 26,999 रुपये आहे. हे तिन्ही फोन 5G सपोर्ट देण्यात आला आहे. 

Redmi Note 11 Pro+ स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा सेन्सरसह इन-बॉक्स 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट करण्यात आले आहे. तसेच या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. Redmi Note 11 Pro मध्ये 108MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तर 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. याशिवाय 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जात आहे. Redmi Note 12 स्मार्टफोन 50MP मुख्य कॅमेरा सेन्सरसह येईल.

रेडमी नोट लाइनअप आधीच चीनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. Redmi Note 12 स्मार्टफोनमध्ये 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याला 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 33W फास्ट चार्जिंग दिले जात आहे. Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 1080 प्रोसेसर देण्यात आला आहे.

हेही वाचा :  रंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?

वाचा : ऋषभ पंत वनडे वर्ल्डकपमधून बाहेर? ‘ही’ धक्कादायक माहिती समोर 

Redmi Note 12 5G ची किंमत आणि ऑफर
4GB+128G – रु. 17,999
6GB+128GB – रु. 19,999
 
तसेच ICICI बँक कार्डवरून फोन खरेदी केल्यास 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. फोनचा पहिला सेल 11 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन mi.com, Mi Home स्टोअर्स, Amazon वेबसाइटवरून खरेदी करू शकतात. 

Redmi Note 12 Pro 5G
6GB+128GB – रु 24,999
8GB + 128GB – रु 26,999
8GB + 256GB – रु 27,99

जर हा फोन घेत असाल तर ICICI बँक कार्डवरून फोन खरेदी केल्यास 3,000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. फोनची विक्री 11 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.

Redmi Note 12 Pro+ 5G
8GB + 256GB – रु 29,999
12GB+256GB – रु. 32,999
या फोनची विक्री 11 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Meloni यांनी कोणत्या मोबाईलमधून घेतला PM मोदींसोबत सेल्फी? डिस्काऊंटमध्ये घेण्याची संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 शिखर सम्मेलनात सहभागी झाले होते. या सम्मेलनात अनेक महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा …

Appleच्या वॉरंटी पॉलिसीमध्ये मोठा बदल; ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री?

Apple Warranty Check: Apple कंपनीने त्यांच्या रिपेअर आणि वॉरंटी पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. कंपनीने या …