Positive News : संस्कार असावे तर असे! स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या 7 हजारातून मुलाने स्वयंपाकीसाठी घेतलं खास गिफ्ट

Trending News : सोशल मीडियावर एका मुलाचं खूप कौतुक होतं आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे प्रत्येक जण म्हणतोय संस्कार असावे तर असे. या मुलाची हृदयस्पर्शी कथा ऐकून नेटकरी भारावून गेले आहेत. त्याच्या कामाचं कौतुक होतं, त्याचा पालकांचाही नेटकरी कौतुक करत आहेत. त्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अंकित असं या मुलाचं नाव असून त्याने जे केलं आहे ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. सोशल मीडियावर त्याच्या गुणाबद्दल त्याचा वडिलांनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी मुलाने स्पर्धेत जिंकलेल्या पैशातून काय केलं हे सांगितलं आहे. (Positive News It should be a ritual After winning the competition the boy bought a special gift for family cook from the 7 thousand received)

संस्कार असावे तर असे!

अंकित नावाच्या या मुलाच्या वडिलांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिलंय. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, मुलाचा आणि घरात स्वयंपाक करणाऱ्या मावशीचा फोटो शेअर करत त्यांनी मुलांचं कौतुक केलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचा वडिलांनी 13 डिसेंबरला इन्स्टाग्रामवर ही पोस्ट केली होती. वडिलांनी लिहिलंय की, अंकितने वीकेंड टूर्नामेंट खेळताना 7,000 रुपयाचं बक्षिस पटकावलं. त्या पैशातून त्याने आमच्या घरातील स्वयंपाकी सरोजा हिच्यासाठी 2000 रुपये किमतीचा मोबाईल फोन विकत घेतला.

हेही वाचा :  बागेत हरवलेलं कानातलं शोधताना कुटुंबाला सापडल्या 1000 वर्ष जुन्या वस्तू; महिलांशी खास कनेक्शन

त्यांनी पुढे सांगितलं आहे की, आमचा मुलगा सहा महिन्यांचा असल्यापासून सरोजा त्याची काळजी घेत आहेत. आजकाल आई वडील दोघेही कामावर जातात, अशावेळी मुलांना सांभाळण्यासाठी आया ठेवल्या जातात. ज्या त्या मुलांची आपल्या लेकासारखी काळजी घेतात. त्यामुळे त्या मुलांमध्ये आणि त्या मावशीमध्ये एक ऋणानुबंध निर्माण होतं. अंकित आणि सरोजा यांचंही असंचं प्रेमाचं नातं आहे. 

या पोस्टवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. त्याच वेळी, अनेक वापरकर्त्यांनी मुलाने उचललेल्या अर्थपूर्ण पाऊलाबद्दल पालकांचे अभिनंदन केलंय. ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. 

आम्हाला अंकितचा अभिमान आहे!

व्हायरल झालेल्या पोस्टवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने लिहिलंय की, ‘उत्कृष्ट काम.’

आणखी एका यूजरने लिहिलंय की, ‘मुलं अशा गोष्टी त्यांच्या पालकांकडूनच शिकतात’, तर दुसऱ्या यूजरने म्हटलंय की, ‘आम्हाला अंकितचा अभिमान आहे.’

हेही वाचा :  Onion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

एकाचवेळी दोघांसोबत काकीचे अनैतिक संबंध, पुतण्याला कुणकुण लागताच तिने रचला भयंकर कट

Crime News In Marathi: राजस्थानच्या बाडमेर येथे गच्चीवर झोपलेल्या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे …

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …