Coronavirus: पुन्हा २०२० सारखी परिस्थिती… चीनमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णालये उभारण्यास सुरुवात | China Building Hospitals As COVID Cases Rise Reminds Early Pandemic Days scsg 91


करोनाची साथ संपत आली असल्याचं वाटत असतानाच चीनने पुन्हा एकदा जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलंय.

नवीन वर्षातील पहिले अडीच महिन्यांचा कालावधी संपलाय. मागील दोन वर्षांमध्ये करोना महामारीमुळे जो त्रास झाला, जे आर्थिक नुकसान झालं ते सारं विसरुन जग पुन्हा नव्याने सुरळीत होण्याचा प्रयत्न करत आहे. ओमायक्रॉनसारख्या नव्या व्हेरिएंटमुळे करोना रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ आणि त्यानंतर करोना रुग्णसंख्येत सातत्याने होणारी घट यामुळे भारतासहीत अनेक देशांमध्ये सध्या तरी करोना रुग्णांसंदर्भात दिलासादायक चित्र दिसत आहे. ही साथ आता संपल्यात जमाय असं चित्र अनेक देशांमध्ये दिसत आहे. मात्र असं असतानाच आता चीनने पुन्हा एकदा जगभरातील देशांना धडकी भरवणारी बातमी दिलीय. खरोखरच करोनाची साथ संपलीय का असा विचार करणारा लावणारी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झालीय.

२०१९ च्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये चीनमध्ये सर्वात प्रथम आढळून आलेल्या करोनाच्या विषाणूनंतर तेथे अनेक करोनाच्या लाटा येऊन गेल्या. मात्र आता या देशामध्ये ओमायक्रॉन या करोना विषाणूची मोठी लाट असून रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागलीय.

२०२० च्या सुरुवातीला ज्याप्रमाणे चीनने तातडीने करोना रुग्णांच्या उपचारांसाठी विशेष रुग्णालये उभारली होती तशीच धावपळ पुन्हा एकदा आता चीनमध्ये दिसत आहे. तात्पुरत्या स्वरुपाची रुग्णालये बांधण्यास चीनने सुरुवात केलीय. यावरुनच आता पुन्हा एकदा चीनमध्ये आलेली करोनाची लाट किती मोठीय याचा अंदाज बांधता येईल. सरकारी मालकीय सीसीटीव्ही या वृत्तवाहिनीवर बुधवारी दाखवण्यात आलेल्या फुटेजमध्ये अनेक मोठ्या क्रेन्स तात्पुरत्या स्वरुपाचं रुग्णालय उभारण्यासाठी ईशान्य चीनमधील जिलिन प्रांतामध्ये काम करत असल्याचं दिसून आलंय. चीनमधील या प्रांतात एका आठवड्यात पाच हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आलेत.

हेही वाचा :  भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नागरिकांनो काळजी घ्या, पुढील चाळीस दिवस महत्त्वाचे

२ कोटी ४० लाख लोकसंख्या असणाऱ्या या प्रांतामध्ये केवळ २२ हजार ८८० बेड्स उपलब्ध असल्याने तातडीने या तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालयाची उभारणी केली जाते आहे. मंगळवारीच रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये उभारलेल्या सहा हजार रुम्सची सेवा जिलिन शहरामध्ये तसेच चँगचुआन उपनगरांमध्ये कार्यरत करण्यात आलीय. ही सेवा पूर्वी वुहानमधील करोना संसर्गाच्या वेळेस वापरण्यात आलेली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढू शकते असा प्रशासनाचा अंदाज असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात सेवा उभारल्या जात आहेत.

बुधवारी चीनमध्ये करोनाचे ३ हजार २९० रुग्ण आढळून आले. यापूर्वी मंगळवारी एका दिवसात पाच हजारांहून अधिक करोना रुग्ण चीनमध्ये आढळून आले होते. हा नवीन विषाणू अधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. चीनमध्ये झिरो कोव्हिड धोरण अंमलात आणण्याचा प्रयत्न असल्याने इतर देशांच्या तुलनेत कमी रुग्ण संख्या वाटत असली तरी हजारच्या वर रुग्ण आढळल्यास येथील यंत्रणेला युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले जातात. मागील काही दिवसांमध्ये चीनमध्ये अनेक शहरांमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन जारी करण्यात आलाय.

हेही वाचा :  BF.7 Variant: चीनमध्ये मृतदेहांचे ढिग, भारताची चिंता वाढली, नव्या Variant ची 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …