महाराष्ट्रातील एक गाव जिथे दिवस फक्त 6-7 तासांचा असतो, स्वर्गाहूनही सुंदर आहे हे गाव

Fofsandi Village Ahmednagar: महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे सूर्योदय दोन ते अडीच तास उशीरा होतो आणि सूर्यास्त दोन-अडीज तास आधी होतो. या गावात दिवसच फक्त 6 ते 7 तासांचा असतो असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. सह्याद्रीच्या डोंगररांगात हे छोटंस गाव वसलं आहे. या गावाचे नाव आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया. 

सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगात हे वास वसलं आहे. फोफसंडी असं या गावाचे नाव आहे. या गावाच्या नावाचीही रंजक गोष्ट आहे. भारतात ब्रिटिशांची राजवट होती तेव्हा फॉफ नावाचा एक इंग्रज अधिरारी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी विश्रांतीसाठी या निसर्गरम्य अशा गावात जात असे. तेव्हा पासून या ठिकाणाचे नाव फॉफसंडे असं पडले. पुढे त्याच शब्दाचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव पडले आहे. 

फोफसंडी गावात अजूनही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गेस्ट हाउसचे अवशेष आहेत. या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. नदी, धबधबा, हिरवाई, डोंगर असल्याने गर्द हिरवी वनराई, दुर्मिळ पशु-पक्षी, जैववैविध्य या गावात आढळते. फोफसंडी हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील आहे. गावात बारा वाड्या असून वळे, पिचड, कोंडार, भगत, पिचड, तातले, गोरे, उंबरे, गवारी, मेमाणे, भांगरे व भद्रिके अशी आडनावाची लोक इथे राहतात. 

हेही वाचा :  'तुम्ही फक्त जिवंत राहा, मी आलोच', वादळात गाडीवर झाड पडल्याने अडकले आई-वडील, 9 वर्षाचा 1.5 किमी धावला

1200 लोकसंख्या, बारा वाड्या व बारा आडनावाचे लोक इथे राहतात.  गावात बारा वाड्या असून वळे, पिचड, कोंडार, भगत, पिचड, तातले, गोरे, उंबरे, गवारी, मेमाणे, भांगरे व भद्रिके अशी आडनावाची लोक इथे राहतात.  या गावातील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. पावसाळ्याच्या चार महिन्यात शेतीत उगवेल ते कमवून आठ महिने रोजदांरीसाठी पुणे किंवा ठाणे जिल्ह्यात जातात. गावात मुख्यतः  भात, नागली, वरई पिके घेतली जातात.

निसर्गाने या गावावर मुक्तहस्ताने उधळण केली आहे. मात्र, रस्ता, पाणी, वीज यासारख्या भौतिक गरजा अजूनही प्रत्येकाला मिळाल्या नाहीयेत. शेतीला पाणी नसल्याने इतर पिके घेता येत नाहीत. मांडवी नदीचा उगम फोफसंडी गावाच्या हद्दीतच होतो. इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे. पावसाळ्यात या गावात तुफान पाऊस पडतो. फोफसंडीचा धबधबा खूप लोकप्रिय आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर…’, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar On Ambulance Scam : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा …

औरंगजेबाने तोडलेली मंदिर पुन्हा बांधण्यापासून महिलांची सेना बनवण्यापर्यंत..’, महाराणी अहिल्याबाईंची प्रेरणादायी कहाणी

Ahilyabai Holkar jayanti 2024: 31 मे रोजी  महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जाते. …