केंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी, नाशिकमध्ये तीव्र पडसाद… आंदोलकांवर पोलिसांचा लाठिचार्ज

नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र  या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी दिसतेय. बंदीच्या निर्णयानंतर मनमाड तसंच लासलगावसह (Lasalgaon) अनेक बाजार समितांमध्ये कांद्याचे लिलाव झालेले नाहीत. तर अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत..

नाशिक जिल्ह्यात पडसाद
मार्चपर्यंत केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी निर्णयाचे नाशिक जिल्ह्यात सर्व पडसाद पडसाद उमटले असून, उमराणा इथं कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडत निषेध केला तर शेकडो शेतकऱयांनी निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी  मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको केला तर नांदगावमध्येही संतप्त शेतकऱयांनी येवला रोडवर  रस्त्यावर उतरत आंदोलन केले. मनमाड,मुंगसे येथे व्यापाऱ्यांना कांदा लिलाव बंद पडले

कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद नाशिकमध्ये दिसून आले आहेत. चांदवडमध्ये सुरु असलेलं आंदोलन चिघळलंय. चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला होता. तेव्हा आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. एक तासापेक्षा जास्त काळ हे आंदोलन सुरु होतं. त्यामुळे वाहतुकीला फटका बसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. दुसरीकडे नाशिकच्या उमराणे गावात रास्तारोको करण्यात आला. कांदा निर्यात बंदीवरून शेतकरी आक्रमक झालेयत. 31 मार्च 2024 पर्यंत कांद्यावर निर्यात बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेयत.

हेही वाचा :  तुर्की चाल, पांढराशुभ्र रंग, रुबाबदार देहबोली, 71 लाखांच्या शनायाची बातच न्यारी

अधिवेशनात विरोधक आक्रमक
कांद्यावर घातलेल्या निर्यात बंदीच्या मुद्द्यावर विधानसभेतही विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी विरोधकांनी केलीय..  तर कांदा निर्यात बंदीबाबत केंद्राशी चर्चा करुन मार्ग काढला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय. दरम्यान कांद्यावरची निर्यात बंदी चुकीची असल्याची प्रतिक्रिया अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांनी दिलीय. तर केंद्राचा निर्णय छळ करणारा असल्याची टीका काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी केलीय..

सोलापूरात कांदा लिला बंद
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरु न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं. तसंच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. हमालांनी माल उचलण्यास नकार दिल्याने कांदा लिलाव बंद पडले आहेत. 

कांदा पाठोपाठ दुधदरासाठी आंदोलन
दरम्यान, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुधाचे टँकर्स फोडण्यात आले आहेत. दुधाचे टँकर्स अडवून त्यातलं हजारो लीटर दूध रस्त्यावर ओतून देण्यात आलंय. दुधाला किमान 40 रुपये प्रतिलिटर भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत… इंदापूरमध्ये सोनाई दूध संघाचे दोन टँकर फोडण्यात आले. तसंच ड्रायव्हरलाही मारहाण करण्यात आलीय. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी 12 तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत..

हेही वाचा :  NMMTचा मोठा निर्णय, उरणला जाणारी बससेवा बंद; 7 हजार प्रवाशांना फटका



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण …

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …