Maharastra Politics : राजकारणात शिव्या झाल्या ओव्या, महाराष्ट्रात ‘ना…लायक’ राजकारण

Maharastra Politics : सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला शिवराळ भाषेची लागण झालीय. नालायक, भिकारचोट असे शब्द सर्रास वापरले जातायत. काही शब्द तर उच्चारूही शकत नाही, इतक्या खालच्या दर्जाचे आहेत. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत शिवराळ शब्दांचा वापर करायला सुरूवात केली आणि थेट मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंनाच नालायक म्हणून खिजवलं. हा नालायक शब्द शिंदे गटाच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. 

शिव्या झाल्या ओव्या

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवराळ भाषा अगदीच काही नवी नाही. याअगोदर नारायण राणेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, मी असतो तर कानाखाली आवाज काढला असता या शब्दांत बोचरी टीका केली होती. आता शिव्यांची लाखोली सुरूच झालीय, तर मग दत्ता दळवी आणि संजय राऊत तरी मागे कसे राहणार?

काय म्हणतात Sanjay Raut?

नारायण राणेंची दोन्ही मुलं नेपाळी म्हणत संजय राऊत राणेंवर पहिल्यांदा बरसले. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. गुन्हा दाखल केला का? मंत्री आहे म्हणून कारवाई नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय.

हेही वाचा :  शिवसेना कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल! दोन मिनिटं सोडवत होते मास्कचे गणित

बाळासाहेब ठाकरे आणि आचार्य अत्रेंची परंपरा सांगणाऱ्या राऊतांनी आता रोखठोक भाषेकडून शिवराळ भाषेत लिहायला आणि बोलायला सुरूवात केलीय. जेलमधून आल्यानंतर राऊतांची मानसिकता बिघडलीय, असा आरोप होत आलाय.. कारण त्यांनी किरीट सोमय्यांबद्दल वापरलेली भाषा… ठाकरे गटाच्या नेत्यांच्या या भाषेमुळं शिंदे गटही चांगलाच चेकाळलाय. आमदार संजय गायकवाडांनीही शिवराळ बाण सोडायला सुरूवात केलीये.

आणखी वाचा – खचलेल्या 41 भारतीयांसाठी देवदूत ठरणारे स्पेशल एक्सपर्ट Arnold Dix आहेत तरी कोण?

महाराष्ट्रात ‘ना…लायक’ राजकारण

दरम्यान, मंत्रिपदावर असलेले अब्दुल सत्तारही मधल्या काळात अशाच अपशब्दांमुळं अडचणीत आले होते. तिकडे गोपीचंद पडळकरही आपल्या शिवराळ शैलीमुळं महाराष्ट्राला परिचित झालेत. ते तर थेट शरद पवारांवरच खालच्या शब्दांत टीका करतात. राजकारण म्हटलं की, दोन द्यायचे आणि दोन घ्यायचे असतात…विरोधकांवर आगपाखड करताना राजकीय नेते शिवीगाळ करण्यात धन्यता मानतात. तुम्ही मात्र मतदार म्हणून हे विसरू नका. योग्य वेळ आली की, अशा नेत्यांना तुम्ही योग्य उत्तर द्या, अशीच अपेक्षा आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ही चोरी बघून तुम्ही ‘धूम’मधले स्टंट विसराल, चालत्या ट्रकमधून काही सेकंदात उतरवलं सामान

Dhoom Style Theft: कोणाचं वाईट करायला जाऊ नका, कोणी ना कोणी तरी आपल्याला बघत असतो, …

Pune Porsche Accident : ‘आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि…’ ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना पोलिसांनी अटक केली आणि …