Trending News : हॉटेल रुममध्ये बेडच्या समोर होता ‘Spy Camera’, हनिमूनसाठी आलं कपल अन् मग…

Spy Camera in Hotels : सुट्टीसाठी बाहेरगावी जायचं म्हटलं तर पहिलं काम आपण हॉटेल बूक करतो. बाहेर गावी हॉटेलमध्ये राहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय नसतो. आपण अनेक वेळा अशा ठिकाणी जातो जिथे आपण पहिले कधीही गेलेलो नसतो. अशावेळी वैयक्तिक सुरक्षिततेची या हॉटेलमध्ये आपण कुठलही हमी देता येतं नाही. तर दुसरीकडे हनिमून कपलसाठी तर हॉटेलकडून खास व्यवस्था केलेली असते. कपल हनिमूनला असताना त्यांच्या जास्त जास्त वेळ हा हॉटेल रुममध्ये जात असतो. अशाच वेळी चांगल्या हॉटेल बूक करणं गरजेचं असतं. (honeymoon couple found spy camera inside power socket pointing bed photo get viral trending news)

हॉटेल संदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  हनिमूनसाठी गेलेल्या कपलच्या हॉटेल रुममधील बेडच्या समोरच स्पाय कॅमेरा असल्याचं समोर आलं. हे जोडपं हॉटेल रुममध्ये असताना तिच्या पतीने रात्री 3 वाजता कॅमेरा पाहिला आणि त्यांना धक्काच बसला. त्यांनी रुमची कसून तपासणी केली. बेडच्या अगदी समोर भिंतीवरील पॉवर सॉकेटमध्ये दोन यूएसबी पोर्ट्समध्ये हा कॅमेरा बसवण्यात आला होता. 

चीनमधील जोडप्यासोबत हा धक्कादायक प्रकार झाला आहे. ते मलेशियातील एअरबीएनबी होमस्टेमध्ये हा छुपा कॅमेरा सापडला आहे. या जोडप्याने स्थानिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xiaohongshu यावर या घटनेबद्दल सांगितलं आहे. या घटनेबद्दल कळताच त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. 

हेही वाचा :  '24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका

या जोडप्याने सांगितलं की, होमस्टे होस्टने पहिल्यांदाच या जोडप्यावर ऑनलाइन बदनामी केल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांनी पैसे परत केले. तर Airbnb ने हे रुम आता त्यांच्या लिस्टमधून काढून टाकली आहे. मात्र इतर रुम लिस्टमध्ये दिसत आहेत. 

त्या धक्कादायक घटनेबद्दल सांगताना ती महिला म्हणाली की, तिने आणि तिच्या पतीने रात्री 3 वाजता कॅमेरा पाहिला. त्यानंतर पूर्ण रूमची आम्ही कसून तपासणी केली. त्या रात्री आम्ही आंघोळ केली नाही, कपडे बदलेले नाहीत. पुढच्या क्षणाला आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट झालो. 7 सप्टेंबरला या जोडप्याने या घटनेची तक्रार पोलिसांना केली. त्यानंतर पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केली. 

मात्र यानंतर जोडप्याने पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट केलं. त्यांनी ठरवलं जे आमच्याबरोबर झालं ते इतर लोकांसोबत होऊ नये म्हणून लोकांना सतर्क करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टवर यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहे. कॅमेरे लावणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. 

दरम्यान मलेशियाचे पर्यटन मंत्री टियोंग किंग सिंग यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी 24 सप्टेंबरला सांगितलं की, होमस्टे ऑपरेटर किंवा नोंदणीकृत मालकांनी कायदा मोडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. तर बीजिंगच्या हैबाओ युदुन सिक्युरिटी कौन्सिल कंपनीचे सुरक्षा तज्ज्ञ झू लँग यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेलीला माहिती दिली की, हॉटेलमधील स्पाय कॅमेरे बहुतेक विद्युत उपकरणे जसं की वॉल सॉकेट्स, कीहोल्स, स्मोक डिटेक्टर, टेलिव्हिजन रिमोट आणि डेस्क दिवे मध्ये लावले असतात. त्यामुळे लोकांनी हॉटेल रुममध्ये गेल्यावर टॉर्चच्या सहाय्याने क्लोज अपमध्ये छिद्र असलेल्या ठिकाणी कसून तपासणी करायला हवी. 

हेही वाचा :  Vande Bharat Express : धक्कादायक! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये धुळमिश्रीत कॉर्नफ्लेक्स; पाहून प्रवाशांची भूकच गेली



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …