सुपरमार्केटमधील फ्रिज उघडताच शॉक लागून 4 वर्षीय मुलीचा मृत्यू, हैदराबादेतील धक्कादायक घटना

Viral Video : जर तुम्हीसुद्धा तुमच्या लहान मुलांना बाहेर फिरायला घेऊन जात असाल तर त्यांच्याकडे लक्ष्य ठेवा. कारण कधी कोणती घटना घडेल याचा काही अंदाज नाही. कारण अनेक वेळा मुलं असा काही खोडसाळ करतात की तो त्यांच्या जिवाला धोका पोहोचवू शकतो. असाच काहीसा प्रकार तेलंगणाच्या (Telangana) हैदराबादमध्ये (hyderabad) घडला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. सुपरमार्केटमध्ये रेफ्रिजरेटर उघडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका मुलीला विजेचा शॉक लागला, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. 

निजामाबाद जिल्ह्यातील नवीपेठमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चार वर्षांची ऋषिता तिचे वडील राजशेखर यांच्यासोबत सुपरमार्केटमध्ये गेली होती. ती फ्रीजमध्ये काहीतरी शोधत होती. रेफ्रिजरेटरच्या दरवाजाला स्पर्श करताच तिला विजेचा जबरदस्त धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याने ऋषिता जागीच स्तब्ध झाली होती. मात्र शेजारीच उभ्या असलेल्या वडिलांच्या ही घटना लक्षात आली नाही. कारण हा सगळा प्रकार अतिशय शांततेत घडला. ऋषिताने असा कोणताही आवाज केला नाही ज्याद्वारे तिच्या वडिलांना काय घडलंय हे कळेल. 

हेही वाचा :  Viral Train Accident : रेल्वे अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; कमजोर हृदयाच्या व्यक्तींनी हा व्हिडीओ पाहूच नये

त्यामुळे बऱ्याच वेळाने वडिलांचे लक्ष्य गेल्यानंतर त्यांनी ऋषिताला बाजूला खेचलं आणि तिला खांद्यावर घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी ऋषिताला तपासलं असता ती कोणतीही हालचाल करत नव्हती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही सगळी धक्कादायक घटना सुपरमार्केटच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना निजामाबादच्या नंदीपेठ इथल्या सुपरमार्केटमध्ये घडली अवघ्या चार वर्षांची ऋषिता वडील राजशेखर यांच्यासह सुपरमार्केटमध्ये घरगुती वस्तू घेण्यासाठी गेली होती. ऋषिता फ्रीज उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. त्यानंतर तिला विजेचा धक्का बसतो आणि ती काही सेकंदांसाठी फ्रीजला चिकटून राहते. ऋषिताचे वडील शेजारीच उभे राहून सामान पाहत होते. ते काही तरी पाहण्यात व्यस्त होते. बाजूला ऋषितासोबत काय घडलंय याची त्यांना कल्पना नव्हती.  ऋषिता फ्रिजमधून काहीतरी बाहेर काढण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. पण नंतर तिला विजेचा जोरदार झटका बसतो आणि त्यातच ऋषिताचा मृत्यू होतो.

काही वेळानंतर ऋषिताच्या वडिलांचे तिच्याकडे लक्ष्य गेले तेव्हा ती फ्रिजला लटकलेली दिसली. तिच्या वडिलांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी ऋषिताला मृत घोषित केले. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खूपच अस्वस्थ करणारा आहे. 

हेही वाचा :  बलात्कारानंतर आरोपी कपडेही घेऊन गेले, नग्न अवस्थेत तरुणीचा आक्रोश; पण वेडी समजून लोक दूर पळाले



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

10वी उत्तीर्ण झालायत? एसटी महामंडळात नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

MSRTC Recruitment 2024: दहावी उत्तीर्ण आहात? तुम्ही आयटीआयदेखील केलंय? मग वाट कसली पाहताय? एसटी महामंडळातील …

10 फुटांची मगर कुंपणावर चढू लागली अन्..; भारतातील ‘या’ शहरामधला थरार कॅमेरात कैद

10 Foot Crocodile Video From Indian City: वरील फोटोत दिसणारं दुष्य हे एखाद्या चित्रपटामधील किंवा अगदी …