नज़र ना लग जाए ! प्रेमाहून लाल रंगाच्या ड्रेसमध्ये मल्होत्रांची सुनेची झलक, तर सिद्धार्थचे पत्नीवरचे प्रेम पाहून चाहते झाले वेडे

बहुचर्चित असा विवाहसोहळा म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या विवाहाकडे पहिले जात होते. शेवटी
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाह ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये झाला. लग्न झाल्यापासून हे जोडपे लोकांच्या नजरेत आहे. दोघांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहेत. लग्ननंतर दोघंही दिल्ली विमानतळावर पाहायला मिळाले. यावेळी कियाराने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसला गोल्डन रंगाची सुंदर बॉर्डर देण्यात आली आहे. यावेळी सिद्धार्थच्या हातावर कियाराच्या नावाची मेहंदी पाहायला मिळत आहे. एकमेकांच्या हातात हात घालून ते सर्वांसमोर आले. यावेळी त्यांचे प्रेम पाहून चाहत्यांनी नज़र ना लग जाए ! अशी कमेंट्स केली आहे. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

कियाराचा लाल रंगाचा सूट

कियाराचा लाल रंगाचा सूट

साध्या कपड्यांमध्ये जैसलमेर सोडल्यानंतर हे जोडपे दिल्लीत गेले. तिथे गेल्यावर कियाराच्या पोशाखात बदल झालेला पाहायला मिळाला. यावेळी मल्होत्रांची सुनेने लाल रंगाच्या एथनिक पोशाखात दिसली. यावेळी तिने सलवार सूट, मॅचिंग पँट आणि दुपट्टा घातलेला दिसला. या ड्रेसमध्ये ती मल्होत्रांची सुन शोभत आहे.

हेही वाचा :  'मिशन मजनू' आणि 'राझी'चं कनेक्शन काय आहे?

सिंदूर, बांगड्या आणि मिनीमल मेकअप

सिंदूर, बांगड्या आणि मिनीमल मेकअप

या लुकला परफेक्ट टच देण्यासाठी कियाराने सिंदूर, बांगड्या आणि मिनीमल मेकअप केला आहे. यावेळी तिने एक मोठी सॉलिटेअर अंगठी, ‘मंगळसूत्र’ आणि ‘चुडा’ परिधान केला. सध्या अशाप्रकारचा ड्रेड पाहायला मिळत आहे.

(वाचा :- हातावर कियाराच्या नावाची मेहेंदी अन् डोळ्यात प्रेम, लव्हबर्ड्सचा लग्नानंतरचा First Look) ​

फक्त प्रेम …

सिद्धार्थच्या हातावर कियाराच्या नावाची मेहंदी

सिद्धार्थच्या हातावर कियाराच्या नावाची मेहंदी

फोटोग्राफर्सनी त्यांच्या लग्नाबद्दल त्यांचे अभिनंदन केल्यावर हसत हसत ते पापाराझींकडे हातात हात घालून चालले. यावेळी सिद्धार्थच्या तळहातावरची मेहेंदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सिद्धार्थने त्याच्या हातावर कियाराच्या नावचा k हे अक्षर काढले आहे.

(वाचा :- पाचूचा रत्नजडीत हार कियाराच्या लग्नात सर्वच दागिने खूपच खास, मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले सर्वांचे लक्ष)

सिद्धार्थचा लुक

सिद्धार्थचा लुक

यावेळी सिद्धार्थने कियाराला मॅचिंग असा लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर या कुर्त्यावर त्याने रंगबेरंगी ओठणी देखील घेतली होती. हँडलुमच्या या ओढणीने त्याला सुंदर लुक मिळाला होता. या ओठणीवर बारीक फुलांची नक्षी काढण्यात आली होती. यावेळी मोजडी घालून त्याने त्याचा लुक पूर्ण केला.

हेही वाचा :  कियारा-सिद्धार्थचं पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न होणार

(वाचा :- Kiara Advani Siddharth गोल्डन पर्स,पिंक शाल घेऊन नवराईची लगीनघाई, कियाराच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो लपवता लपला नाही)

सिद्धार्थ-कियारा प्रेमात कधी पडले?

सिद्धार्थ-कियारा प्रेमात कधी पडले?

कियारा आणि सिद्धार्थ नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल बोलले नाहीत. डेटिंगच्या अफवा त्याने ना स्वीकारल्या ना नाकारल्या. 2021 मध्ये रिलीज होणाऱ्या ‘शेरशाह’च्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियारा प्रेमात पडले होते.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …

Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येराज्याच्या कोकण किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी …