फेस्टिव्ह सेलचे बिगुल वाजले; Flipkartचा सेल, ‘या’ तारखेपर्यंत थांबवा खरेदी

Flipkart Big Billion Days 2023: सणासुदीला सुरुवात होताच अनेक इ-कॉमर्स कंपन्यांनी ऑफर्स सुरू केल्या आहेत. अॅमेझॉननंतर आता फ्लिपकार्टनेही सेलची तारिख जाहिर केली आहे. या सेलदरम्यान अनेक भन्नाट प्रोडक्टवर डिस्काउंट देण्यात आले आहे. मोबाइल फोन, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टवॉच, इअरबड आणि स्मार्ट टिव्हीवरही ऑफर्स देण्यात आले आहेत. 8 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल सुरू राहणार आहे. ICICI, Axis, Kotak बँकातून पेमेंट केल्यानंतर आणखी सूट मिळू शकणार आहे. 

Flipkart Big Billion Days सेलदरम्यान Apple, iQoo, OnePlus, Samsung, Realme आणि Xiaomi सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे. Moto G54 5 पासून ते  Samsung Galaxy F34 5G आणि Realme C51 पर्यंत अनेक स्मार्टफोन्सच्या कमी किंमतीत मिळणार आहे. इतकंच नव्हे तर, , iPhone 14 सीरीज, iPhone 13 आणि Galaxy S23 Ultraच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे.

Flipkart Big Billion Days Sale 2023

सेल सुरू होण्याच्या एक दिवस आधी  Flipkart Plus मेंबर्सना एक दिवस आधी अॅक्सेस दिला जाणार आहे. या इन्हेंटमध्ये स्मार्टफोन, अन्य इलेक्ट्रॉनिक्स, एक्सेसरीज, स्मार्ट टीव्ही आणि होम अप्लायंसेसवर 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त काही बँक ऑफर्सही दिल्या जाणार आहेत. 

हेही वाचा :  तुमचा मोबाईल हॅक झाल्यावर देतो हे संकेत.. जाणून घ्या..

फ्लिपकार्ट सेलमध्ये शॉपिंग करणाऱ्यांना ICICI बँक, Axis बँक और Kotak बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. सेलच्या दरम्यान पेटीएम युजर्स, युपीआय आणि वॉलेटच्या माध्यमातून खरेदी केल्यास कॅशबॅक व डिस्काउंटदेखील मिळणार आहेत. त्याचबरोबर ग्राहक पे-लेटर सेवेचाही लाभ घेऊ शकणार आहेत. त्याव्यतिरिक्त नो कॉस्ट ईएमआय पर्याय आणि एक्सचेंज डिस्काउंटदेखील उपलब्ध आहेत. 

स्मार्टफोन बरोबरच अन्य प्रोडक्टवरदेखील डिस्काउंट मिळणार आहेत. कमी किंमतीत तुम्हाला खरेदी करता येणार आहे. स्मार्ट टिव्ही असो किंवा होम अप्लायंसेस प्रत्येक कॅटेगरीवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. त्याव्यतिरिक्त काही स्पेशल डिल्सदेखील मिळू शकते. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Interesting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?

Interesting Facts : विमान प्रवास हा पहिलावहिला असो किंवा मग अगदी सराईताप्रमाणं नेहमीच्या नेहमी केला …

देशभर चर्चेत असलेल्या पोर्श कारची किंमत किती? स्पीड, मायलेज सर्वच जाणून घ्या…

Pune Accident News:  पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोर्श …