…म्हणून पाकिस्तानच्या ISI ने कॅनडात केली निज्जरची हत्या; भारत-कॅनडा वादाला नवं वळण

Pakistan ISI Killed Khalistani Nijjar: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची हत्या पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने ‘न्यूज 18 ने’ हे विृत्त दिलं आहे. निज्जरच्या ओळखीच्या लोकांचा कटात सहभाग असल्याशिवाय त्याच्या इतक्या जवळ जाणं शक्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआय भारताला फटका बसवा, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी व्हावी म्हणून निज्जरला संपवण्याचा विचारात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, राहत राव आणि तारिक कियानी हे 2 आयएसआय एजंट्स पाकिस्तानसाठी काम करत आहेत.

जवळच्या व्यक्तीशिवाय हल्ला शक्यच नाही

राहत राव आणि तारिक कियानी हे आयएसआयला परदेशामधून दहशतवादी कायरवायांचं नियोजन करण्यास मदत करतात. भारतात मोस्ट वॉण्टेड असणाऱ्या दहशतवाद्यांसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय आणि नियोजन करण्यात राहत राव आणि तारिक कियानीचा सहभाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायिक कारणांमुळे तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांकडून अधिक खंडणी वसूल करण्यासाठी राहत राव आणि तारिक कियानी हे निज्जरच्या हत्येच्या कटात सहभागी झाले असावेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला निज्जरच्या जवळपास जाणं शक्यच नव्हतं असं सूत्रांचं म्हणणं आहे. निज्जर हा संभाव्य हल्ल्याच्या भीतीने फार सक्रीय आणि सतर्क राहायचा. त्यामुळे एखाद्या ओळखीतल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय त्याची गोळ्या झाडून हत्या करणं शक्य नसल्याचं भारतीय सूत्रांचं म्हणणं आहे.

हेही वाचा :  Ajit Doval : अजित डोवाल यांचा एक मोठा निर्णय आणि पाकिस्तान मध्ये खळबळ

नक्की पाहा >> भारत-कॅनडा वादात अक्षय कुमार ट्रोल! Memes चा पडला पाऊस; पाहा मिम्स, जाणून घ्या कारण

निज्जरच्या आजूबाजूला आयएसआयच्या माजी अधिकाऱ्यांचं जाळं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निज्जरच्या शेजारी पाकिस्तानी लष्कराशी संबंधित अनेक माजी अधिकारी राहत होते. पाकिस्तानी लष्करामधील मेजर जनरलपासून ते हवलदारापर्यंत आणि माजी आयएसआय अधिकारीही राहत होते. निज्जरला संपवण्याचं काम त्याच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या पाकिस्तानी लष्कराशी आणि आयएसआयशी आता किंवा पूर्वी संबंध असलेल्या लोकांपैकी कोणीतरी केलं असणार असंही भारतीय सूत्रांचं म्हणणं आहे. राहत राव आणि तारिक कियानी यांना स्थानिक स्तरावरील अंमली पदार्थांच्या उद्योगांमध्ये वर्चस्व स्थापन करता यावं म्हणून निज्जरला आयएसआयने संपवल्याची शक्यता नाकारता येत नाही असं सूत्रांनी म्हटलं आहे. निज्जरची ताकद दिवसोंदिवस वाढत होती. तो स्थानिक कॅनडीयन लोकांमध्येही लोकप्रिय होत होता. त्यामुळेच राहत राव आणि तारिक कियानीची किंमत कमी होऊ नये म्हणून निज्जरला आयएसआयनेच संपवल्याचं सांगितलं जातं. 

या तिघांनी मिळून निज्जरला संपवल्याचीही शक्यता

भारतीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहत राव, तारिक कियानी आणि फुटीरतावादी खलिस्तानी नेता गुरचरण पन्नू या तिघांनी मिळून अंमली पदार्थांचा कारभार आपल्याच हाती रहावा म्हणून एकत्र येऊन निज्जरला संपवलं असावं. कॅनडामधील दहशतवादी कुरापतींसाठी लागणारा पैसा हा मूळपणे अंमली पदार्थांच्या व्यवसायामधूनच येत असल्याने त्यासाठीच निज्जरला संपवलं असावं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाधवा सिंग आणि रणजीत सिंग नीतासारखे पाकिस्तानमधील शीख सामाजाच्या नेते हे हरदीप सिंग निज्जरचे निकटवर्तीय होते. या लोकांबरोबर असलेले निज्जरचे संबंधही आयएसआयसाठी अडचणीचे ठरत होते. निज्जरमुळे या लोकांच्या हलचालींवरही बंधनं येत असल्याने आयएसआयने निज्जरला संपवल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा :  'मी रिलेशनमध्ये...', निशांत पिट्टीसोबतच्या 'त्या' फोटोवर कंगना रणौतचा खुलासा

नक्की वाचा >> भारत-कॅनडात संघर्षाची काडी टाकणारी महिला कोण? ‘खऱ्या व्हिलन’ने काय केलंय पाहा

हॅपी पीएचडीसारखे कार्यकर्ते ठार

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामधील कारवाईमध्ये हॅपी पीएचडीसारखे अनेक खलिस्तान समर्थक मारले गेले. त्यामुळे कॅनडामधील अंमली पदार्थांचा कारभार आपल्या नियंत्रणात असावा यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयने आधी निज्जरचा काटा काढल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

नक्की वाचा >> लांडा नावाच्या या माणसाची माहिती द्या 10 लाख कॅश मिळवा; राष्ट्रीय तपास यंत्रणेची ऑफर

3 महिन्यांपूर्वी झालेली हत्या

18 जून 2023 रोजी कॅनडामधील सुरे येथे हरदीप सिंग निज्जरची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जर कॅनडामधील सिख फॉर जस्टिस आणि खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने खलिस्तानी दहशतवादी असलेल्या निज्जरवर 10 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं. याच मुद्द्यावरुन कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या हत्येमध्ये भारताचा सहभाग होता असा कॅनडीयन पंतप्रधानांनी आरोप केला आहे. मात्र हे आरोप बिनबुडाचे असून भारताने ते फेटाळले आहेत. या प्रकरणावरुन दोन्ही देशांमधील संबंध आणखीन ताणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :  Political News : राऊत शिवसेना डुबवणार, ठाकरे गट 8 ते 10 दिवसांत रिकामा होईल - संजय शिरसाट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …