‘…तर पुढच्या चौकात यमराज तुमची वाट पाहत असेल’; योगी आदित्यनाथ यांचा सूचक इशारा

UP CM Yogi Adityanath Warning: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मानसरोवर रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये 343 कोटी रुपयांच्या विकास योजनांचं लोकार्पण आणि भूमीपूजन केलं. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना संबोधित करताना आदित्यनाथ यांनी, ‘कायदा हा संरक्षणासाठी असतो. मात्र कायद्याला वेठीस धरुन व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी कोणालाच नाही. कायदा सुरक्षेसाठी आहे. मात्र कोणी आयाबहिणींची छेड काढली तर पुढच्या चौकात यमराज त्या आरोपींची वाट पाहत असतील,’ असं सूचक विधान केलं.

विकासकामांच्या आड येणारे अडथळे

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सरकार विकास, लोक कल्याण आणि भेदभाव न करता सर्व लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. याबद्दलचा संकल्प सरकारने केला असून त्यासाठी सर्व त्या आवश्यक समर्पित उपाययोजना केल्या जात आहे. सरकारबरोबरच नागरिकांनीही आपली कर्तव्यं पार पाडली तर विकासकामांच्या आड येणारे अडथळे आपोआप उघड होतील. विकासाच्या आड येणाऱ्यांचे चेहरे समोर आणण्याचं काम सरकारही करत असल्याचं मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.

हेही वाचा :  ठरलं! 'या' तारखेला योगी आदित्यनाथ घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, व्हीव्हीआयपींची लिस्टही तयार

विकासकामांना प्रथम प्राधान्य

विकासकामांना सरकारचे प्रथम प्राधान्य आहे. विकासकामासंदर्भात कोणताही बेजबाबदारपणा सहन केला जाणार नाही. संस्था कोणतीही असली तरी त्यांनी मानक आणि गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड न करता विकासकामं केली पाहिजेत, असं मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले. आज गोरखपूर आणि उत्तर प्रदेशची ओळख ही विकासकामांमुळेच निर्माण झाली आहे, असंही आदित्यनाथ म्हणाले. यावेळेस बोलताना 6 वर्षांपूर्वी गोरखपूरची देशात आणि उत्तर प्रदेशमध्ये नेमकी काय स्थिती आहे? या प्रदेशाबद्दल लोक काय विचार करायचे, विकासाची परिस्थिती काय होती याबद्दलही भाष्य केलं.

आरोपींना इशारा

“इथली परिस्थिती काय होती सर्वांना ठाऊक आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मागील 6 वर्षांमध्ये उत्तर प्रदेश आणि गोरखपूरने आपली ओळख निर्माण केली आहे. आज उत्तर प्रदेशची आणि गोरखपूरची ओळख देशामध्ये विकास, सुशासन आणि उत्तम कायदा व्यवस्थेसाठी निर्माण झाली आहे. येथे मागील अनेक दशकांपासून अडकून पडलेल्या विकास योजना सुरु झाल्या आहेत,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. याचवेळी त्यांनी महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांना सोडणार नाही असा सूचक इशारा दिला. 

अनेकदा घडलेत असे प्रकार

मागील काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एनकाऊंटरच्या माध्यमातून अनेक आरोपींचा खात्मा करण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी मोठा गोंधळ घातल्याचंही पहायला मिळालं. कधी थेट एनकाऊंटर तर कधी अपघाताच्या माध्यमातून अनेक वादग्रस्त प्रकरणांमधील आरोपींचा कोर्टात खटला सुरु असतानाच आकस्मीक मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :  Valentine Day 2023: गायच यांना मिठी मारायला आली; व्हिडिओ पाहून म्हणाल हा कसला Cow Hug Day



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

एक फोन आणि…. पुण्यातील ‘त्या’ अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोर

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : (Pune Porsche Accident) पुण्यातील कल्याणी नगर अपघाताला आता काही …

Pune Porsche Accident सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, ‘राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..’

Pune Porsche Accident Case Uddhav Thackeray Group Demad: “पुण्यातील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरण दाबून टाकण्यासाठी सत्ताधारी …