ऐन सणासुदीला पुण्यात पाणीकपात; ‘या’ भागांमध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद

सागर आव्हाड, झी मीडिया

Pune Water Supply News: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्या गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी पनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर, भामा- आसखेड, पंपिंग येथील विद्युत, पंपिंगविषयक आणि  दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळं पाणीपुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

गुरुवारी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी पुणे शहर व उपनगरांत संपूर्ण एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि.1 सप्टेंबर ) रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुहूर्तानुसार, बुधवारी रक्षाबंधन असून सायंकाळी सहानंतर तसेच गुरूवारी दिवसभर रक्षाबंधनाचा मुहूर्त आहे. तर बुधवार, गुरूवार नारळी पोर्णिमेचा सण आहे. परिणामी, अनेकांकडे सणांसाठी पाहूण्यांची रेलचल असणार आहे. त्यामुळं महापालिकेने ऐन सणासुदीत पाणी बंदचा निर्णय घेतल्याने नागरिकांना सणांच्या दिवसात पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे भाग

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्‍कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वेरस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मीठानगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. 42-46 (कोंढवा खुर्द), पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर,

हेही वाचा :  APMC Election Results : बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी; भाजप-शिंदे गट पिछाडीवर

कोंढवा बुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, चांदणी चौक, किष्किंदा नगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे-माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुलनगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर, लष्कर भाग, पुणे स्थानक, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडिवाला रस्ता, रेसकोर्स, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगररस्ता परिसर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …