Independence Day 2023 : ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यात फरक काय? जाणून घ्या काय असतात नियम

Independence Day 2023 : 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत (Har Ghar Tiranga) 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरात तिरंगा फडकावून सेल्फी पाठवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी देशभरात ध्वजारोहण करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्यावरून (Red Fort) ध्वजारोहण करतील आणि जनतेला संबोधित करतील. 15 ऑगस्टला भारतीय नागरिक अभिमानाने तिरंगा फडकावतील, पण हे करत असताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तिरंगा फडकावण्याचे काही नियम असतात. हे नियम प्रत्येक भारतीयाला माहित असायलाच हवेत. चुकीच्या पद्धतीने तिरंगा फडकावल्यास शिक्षाही होऊ शकते.

ध्वजारोहण आणि झेंडा फडकावणं यातला फरक?
बऱ्याचदा आपल्याला ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यात मोठा फरक आहे. ध्वजारोहण स्वातंत्र्यदिनाला म्हणजे 15 ऑगस्टला केलं जातं. तर प्रजासत्ताकदिनाला म्हणजे 26 जानेवारीला ध्वज फडकवला जातो.

– स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणात तिरंगा दोरीच्या मदतीने खालून वरच्या दिशेने खेचून मग तो फडकवला जातो. 15 ऑगस्टच्या दिवशी ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ खाली उतरवून भारताचा तिरंगा वरती चढविला गेला होता. म्हणून याला ‘ध्वजारोहण’ ज्याला इंग्रजीमध्ये ‘Flag Hoisting’ असं म्हणतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटीश साम्राज्यातून मुक्त झाला. त्यामुळे यादिवशी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर (Red Fort) ध्वजारोहण होतं.

हेही वाचा :  पुन्हा याच लाल किल्ल्यावरुन... 2024 तयारी करत महागाईसह विविध मुद्द्यावर पंतप्रधानांनी केले भाष्य

– प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो. आणि त्यामध्ये फुलं टाकून तो थेट फडकवला जातो. याला ध्वज फडकावणे म्हणतात. इंग्रजीत त्याला Flag Unfurling असं म्हणतात. या दिवशीच भारतीय संविधान (Indian Constitution) लागू झालं होतं. या दिवशी राष्ट्रपती राजपथ इथं झेंडा फडकवतात.

ध्वज फडकावण्याचे नियम

– तिरंगा फडकवताना तो ओला होऊ नये आणि कोणत्याही प्रकारे तो खराब होऊ नये याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. तिरंग्यात भगवा रंग नेहमी शीर्षस्थानी असावा, पांढरा मध्यभागी असावा आणि हिरवा नेहमी तळाशी असावा. ध्वजाची मोडतोड करू नये. तरच तुम्ही तो फडकवू शकता.

– ध्वजाचा आकार आयताकृती असावा. त्याच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 3.2 असावे आणि अशोक चक्राला 24 आऱ्या असायला हव्यात.

– यापूर्वी हाताने बनवलेले कापडी, पॉलिस्टर, लोकर, खादी इत्यादीपासून ध्वज बनविण्यास परवानगी होती, पण आता मशीनने बनवलेले ध्वजही फडकविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

– कोणत्याही परिस्थितीत तिरंगा जमिनीला लाागता कामा नये. राष्ट्रध्वजापेक्षा दुसरा कोणताही ध्वज उंच त्यापेक्षा उंजीवर असू नये.

– ध्वजाचं नुकसान करणं किंवा शाब्दिक अपमान करणं हा अपराध आहे. यासाठी तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात.

हेही वाचा :  Lakhpati Didi Yojana : 1 कोटी महिलांना बनवलं 'लखपती दीदी', निर्मला सितारमण यांचा दावा; पण ही योजना आहे तरी काय?

– ध्वजावर काहीही लिहू नये. तिरंगा पूर्ण आदराने दुमडून ठेवावा. तिरंगा फेकणे किंवा नुकसान करणे निषिद्ध आहे.

– तिरंगा फडकावणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की तो गाडीवर लावून कधीही फडकावू शकतो. ध्वजसंहितेनुसार, घटनात्मक पदांवर असेल्या लोकांनाच वाहनावर तिरंगा फडकवण्याची परवानगी आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather Update: राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर

Maharashtra Weather Update: राज्याच्या बहुतांश भागात दाखल झाल्यानंतर पाऊसाने काही दिवस विश्रांती घेतल्याचं दिसून आलं …

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …