लुडो-PUBG नंतर आता Insta, झारखंडमध्ये सीमा हैदरसारखी लव्ह स्टोरी! पोलंडहून मुलीसोबत ती…

Trending Love story : प्रेम हे आंधळं असतं. यात जात पाहिली जात नाही, तर धर्म पाहिला जातो. ना रंग ना वय…सोशल मीडियावर अशाच काही देशाची सीमा ओलांडून येणाऱ्या महिलांच्या प्रेम कहाणी (Love Story) गाजत आहे. सीमा हैदर (Seema Haider) आणि अंजू (Anju) यांच्या प्रेम कहाणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया असो किंवा न्यूज चॅनेलवर ट्रेंडिंगमध्ये आहेत. अशातच अजून एका महिलेची प्रेम काहाणी समोर आली आहे. 

ही प्रेम कहाणी आहे पोलंडहून भारतात आलेल्या बारबराची. लूडो (Ludo), पबजी (PUBG), फेसबुक (Facebook) प्रेमानंतर आता इन्स्टाग्राम (Instagram Love story) प्रेम कहाणी व्हायरल होते आहे. सीमा सचिन आणि अंजू नसरुल्लाह या प्रेम कहाणी भारत पाकिस्तान यांच्यामधील होती. बारबराची प्रेम कहाणी ही पोलंड आणि भारताची आहे. 49 वर्षींय बारबरा आपल्या 6 वर्षीय लेकीला घेऊन झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात प्रेमासाठी दाखल झाली. बरतुआ गावातील 35 वर्षीय शादाबवर तिचं इन्स्टाग्रामवर प्रेम जडलं. 

अशी सुरु झाली लव्ह स्टोरी! 

शादाब आणि बारबरा यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 2021 मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली. पहिले ओळख, मग गप्पा यातून मैत्री आणि मग हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आता ती पोलंडमध्ये तो भारतात…हा दुरावा काही सहन होई ना. बारबरा हिचं पहिलं लग्न तुटलं होतं. घटस्फोटानंतर ती आणि तिची 6 वर्षांची मुलगी अशा त्या दोघी राहत होती. (Poland Love story polish woman reached jharkhand with daughter in shadab instagram love)

हेही वाचा :  Video : 78 वर्षांच्या आजोबांना विमानतळावर दिसली शाळेतील Crush अन् मग त्यांनी...

ती शादाबला भेटण्यासाठी व्याकूळ झाली होती. आता तिला भारतात जायचं होतं. तिने व्हिसासाठी अर्ज केला आणि ती पाच वर्षांच्या टूरिस्ट व्हिसावर भारत गाठलं. लहान मुलीसोबत ती भारतातील हजारीबागमध्ये आली. तिथे ती एका हॉटेलमध्ये मुलीसोबत राहत होती. पण आता सातासमुद्र पार केल्यानंतरही ती त्याला थोड्या वेळासाठीच भेटू शकतं होती. त्यांनी दोघांनी निर्णय घेतला. 

ती काही दिवसांनी शादाबच्या गावी तिच्या घरी मुलीसह राहू लागली. पोलांड थंड शहर आणि झारखंडमधील या गावात अतिशय उकाडा…तिला आणि मुलीला हा उकाडा काही सहन होई ना. म्हणून तिने दोन एसी आणि एक टीव्ही खरेदी केला. आता ती या घरात रुळत होती. एखाद्या भारतीय गृहिणीसारखी ती घरातील सर्व कामं करत होती. अगदी सकाळी उठून गायीचं शेण काढण्यापासून भारतीय पदार्थ असलेलं स्वयंपाक करेपर्यंत सगळं. 

गावातील प्रत्येकाचं लक्ष या जोडप्याकडे जात होतं. या गोष्टीची कल्पना गावातील डीएसपी यांनाही मिळाली. परदेशी महिला गावात राहत असल्याने त्यांनी विचारपूस करण्यासाठी त्यांना बोलवलं. तेव्हा कळलं की, ती पाच वर्षांच्या टूरिस्ट व्हिसावर भारतात कायदेशीर पद्धतीने आली आहे. आता काही दिवसांनी तिच्यावर परत जाण्याची वेळ येणार आहे. 

हेही वाचा :  मुंबईसह राज्यभरात आज काय आहेत पेट्रोलचे दर? घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या

बारबरा पोलांडमध्ये एका प्रतिष्ठीत कंपनीत नोकरीला आहे. तिच्याकडे तिथे बंगला, गाडी सगळे आरामदाय गोष्टी आहेत. शादाबनेही हार्डवेअर नेटवर्किंगमध्ये डिम्लोमा केला आहे. त्यामुळे शादाबने पोलांडला यावं आणि तिच्यासोबत लग्न करावं अशी तिची इच्छा आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

Ebrahim Raisi : इराणच्‍या राष्ट्राध्यक्षाच्‍या हेलिकॉप्टरचा अपघात; पीएम मोदी चिंतेत, म्हणाले…

PM Modi On Iran helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी (Ebrahim Raisi) आणि परराष्ट्र …